kolhapur : कोल्हापूरात तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाईन
शहरातील स्टेशन रोड परिसरातील एका हाॅटेलसमोर दोन गटांतील वादातून तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दहाहून अधीक जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी मार्शल ऊर्फ बापू मुकुंद गर्दे (वय:२७, रा. राजारामपुरी दुसरी गल्ली) याच्यावरही बेकायदा जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्टेशन रोडवर रविवारी रात्री पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मार्शल गर्दे हा तरुण जखमी झाला होता. त्यामुळे नातेवाईकांनी व सहकार्यांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. यावेळी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी जमावाची समजूत घालत सोमवारी पहाटे परस्परविरोधी गुन्हे दाखल केले. या प्रकरणी कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सदर गुन्ह्याचा तपास शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.

मात्र घटनास्थळावर तर वेगळीच चर्चा…
मार्शल गर्दे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा तरुण असून, तो काही मित्रांसोबत स्टेशन रोडवर आला होता. याठिकाणी त्याची माजी हॉकीपटू दया पाटील व त्यांच्या सहकाऱ्यासोबत त्याचा वाद झाला होता.

संबंधित घडामोडी:
मद्यधुंद पोलिसांची तरुणाला दगड-विटांनी मारहाण; तरुण गंभीर जखमी