Kondhwa News | स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके आणि माजी नगरसेवक रईस सुंडके यांच्या आईचे निधन

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – Kondhwa News | पुणे मनपाच्या (Pune Corporation) स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अनिस सुंडके (Anis Sundke) आणि माजी नगरसेवक रईस सुंडके (Raees Sundke) यांच्या मातोश्री श्रीमती तलत परवीन सुंडके (वय 75) यांचे वार्धक्याने रविवारी सकाळी निधन झाले आहे. त्यांच्या मातोश्री श्रीमती आशाबी सय्यद यासुद्धा पुणे मनपाच्या नगरसेविका होत्या, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे मोलाचे योगदान होते. विद्यमान नगरसेविका हमीदा सुंडके (corporator hamida anis sundke) यांच्या त्या सासू होत. (Kondhwa News)

 

तलत सुंडके यांच्या निधनाचे वृत्त समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), अनेक नगरसेवक तथा विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी आपल्या सहवेदना व्यक्त करून सुंडके परिवाराचे (Sundke Family) सांत्वन केले आहे. (Kondhwa News)

 

त्यांच्या पार्थिवावर नाना पेठेतील (Nana Peth) मन्नुशाह मस्जिद कबस्थान येथे 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

Web Title :- Pune Crime | murder of youth in bharti vidyapeeth police station area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा