वानवडीतील खुन प्रकरणाचा मुख्य सुत्रधार जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  वानवडी येथील लक्ष्मी पार्क जंगल परिसरात हेवन पार्क सोसायटी रोडवरील १२ वर्षाच्या मुलाचा दगडाने ठेचून खुन केल्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला कोंढवा पोलिसांनी २४ तासात पकडले. सतीश बाबुराव गायकवाड (रा. वानवडी बाजार) असे त्याचे नाव आहे.

अझान झहीर अन्सारी (वय१२, रा.शिवनेरी, कोंढवा खुर्द) याचा खुन केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी रोहित गौतम बनसोडे (वय २७, रा. उंड्री), अजय विजय गायकवाड (वय २२, रा. कृष्णानगर, महंमदवाडी रोड), श्रीकांत भिमराव साठे (वय २०, रा. कृष्णानगर), अक्षय अनिल जाधव (वय २०, रा. आझादनगर, वानवडी) यांना पकडले होते. त्यांच्यातील मुख्य सुत्रधार सतीश गायकवाड हा फरार होता.

तपास पथकातील पोलीस नाईक कौस्तुभ जाधव यांना गायकवाड हा मोहम्मदवाडी स्मशानभूमी येथील ओढ्यामध्ये लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ओढ्यामध्ये लपून बसलेल्या अवस्थेत पकडले. कोंढवा पोलीस ठाण्यात आणून चौकशी केल्यावर त्याने आपण इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्याला वानवडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे, सहायक फौजदार इकबाल शेख, योगेश कुंभार, कौस्तुळ जाधव, अझीम शेख, दीपक क्षीरसागर, उमाकांत स्वामी, तनावडे,ज्योतिबा पवार, मोहन मिसाळ यांनी केली आहे.