Pune News : कोरेगाव भीमा येथील कार्यालयातील तलाठी महिलेला आणि एकाला 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – 7/12 उताऱ्यावर नोंद करण्यासाठी खासगी व्यक्तीने व कोरेगाव भीमा तलाठी कार्यालयातील तलाठी महिलेला 20 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. अश्विनी दत्तात्रय कोकाटे/अश्विनी सुहास पाचारणे (वय 32) तसेच निवृत्ती लक्ष्मण कानगुडे (वय 29) अशी पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

यातील तक्रारदार  यांची 7/12 वर नाव नोंदणीसाठी व जमिन वाटपाची नोंद करण्याकरीता त्यांनी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. त्यावेळी खासगी व्यक्ती व लोकसेवक महिला तलाठी यांनी त्यांच्याकडे 40 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा कारवाईत तक्रारदार यांच्याकडून 40 पैकी 20 हजार रुपये स्वीकारली. तसेच उर्वरित 20 हजार  खाजगी व्यक्ती निवृत्ती याला घेताना पकडण्यात आले आहे.