नागरिकांचे सुख, आनंद आणि सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता : चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सर्वसामान्य नागरिकांचे सुख, आनंद आणि सुरक्षितता हीच आमची नेहमी प्राथमिकता असून, यासाठी आम्ही आनंदी विभाग या विषयावर काम करत आहे. आपल्या राज्याचा हॅपिनेस इंडेक्स सर्वोच्च ठेवण्यासाठी आम्ही प्राधान्याने काम करू, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी केले. नवचैतन्य हास्य क्लब, पुणे यांच्यावतीने आशिष गार्डन येथे आयोजित हास्य योग कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी पुण्याचे खासदार गिरीश बापट, नगरसेवक मुरलीधर मोहोळ, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, शिवसेनेचे शाम देशपांडे, हास्य क्लबचे विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू, रामानुजदास मणियार, सुनील देशपांडे, जयंत दशपुत्रे, समन्वयक संदीप खर्डेकर यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या जीवनात समाजातील प्रत्येक व्यक्ती सुख आणि आनंदासाठी सतत धडपडत आहे. महायुती सरकारचे गेल्या पाच वर्षात राज्यातील ग्रामीण जनतेचं आयुष्य सुखी, समाधानी होण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या. त्यामुळे ग्रामीण शहरी भागातील जनता आज समाधान व्यक्त करत आहे.”

ते पुढे म्हणाले की, “शहरी भागातील जनता धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आज इथली जनता सुख आणि आनंदाच्या शोधात आहे. यासाठी महायुतीचे सरकार आनंदी विभाग यावर काम करत आहे. या विभागाच्या माध्यमातून शहरी भागातील जनतेचं जीवनमान सुखी, आनंदी आणि सुरक्षित करणे, यावर काम करत आहे.” असे त्यांनी यावेळी सांगितले.

खा. गिरीश बापट म्हणाले की, “आयुष्यात सुखासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत जे काम केलं आहे, त्यावर समाजातील प्रत्येक घटक आज समाधान व्यक्त करत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेचा विश्वास असाच कायम राहिल,” असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

चंद्रकांत पाटील यांचा हास्य योग

संस्थेच्यावतीने आयोजित हास्य योगामध्ये चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेत, हास्य योगाची प्रात्यक्षिके केली.शरद पवारांपासून इतर सर्व विरोधकांकडून चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर तुफानी हल्ला चढवण्यात येत आहे. परंतु त्या सर्वांचा मोठ्या धीराने सामना करून दादांच्या चेहऱ्यावरील हास्य सतत कायम असते. आजच्या हास्ययोग प्रात्यक्षिक देखील त्याची प्रचिती आली.

 

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like