‘क्रिकेटर’ क्रुणाल पंड्यानं रात्री 2 वाजता अर्ध्या टीमसमोर केलं होतं ‘पंखुडी’ला प्रपोज ! आता झाला ‘खुलासा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – भारतीय क्रिकेट टीममधील हमफनमौला खेळाडू क्रुणाल पंड्या आपल्या खासगी आयुष्यातही एखाद्या हिरोपेक्षा कमी नाही. खासगी आयुष्यात त्याचं अलगच रूप आहे. त्याची पत्नी पंखुडी शर्मा हिनं याबाबत खुलासा केला आहे. पंखुडी एक मॉडेल आणि इव्हेंट मॅनेजर आहे. एका मुलाखतीत तिनं क्रुणाल आणि तिच्या खासगी आयुष्यातील काही रोमांचक किस्से सांगितले आहेत. तिनं सांगितलं की, क्रुणालनं रात्री दोन वाजता अर्ध्या टीम समोर तिला प्रपोज केलं होतं.

एका खास मुलाखतीत बोलताना पंखुडी शर्मा म्हणाली, “मला आजही आठवतं क्रुणालनं मला खास अंदाजात प्रपोज केलं होतं. ती रात्र होती 2017 मधली. तेव्हा मुंबई इंडियन्सनं मॅच तर जिंकली होतीच परंतु क्रुणालही मॅन ऑफ द मॅच ठरला होता. आयपीएलच्या फायनलनंतर प्रत्येकासाठी ती आनंदाचीच रात्र होती. जेव्हा क्रुणाल गाणं गात आपल्या खोलीत आला होता तेव्हा मी आणि हार्दिक त्याच्या खोलीतच होतो.”

‘मला धक्काच बसला’

पंखुडी पुढे बोलताना म्हणाली, “त्याचा मुड खूप चांगला होता. मुंबईच्या टीममधील अनेक खेळाडू त्याच्या मागे मागे खोलीत आले होते. मला त्यानं उभं राहण्यासाठी सांगितलं. नंतर अचानक त्यानं मला विचारलं की, माझ्या लग्न करशील का. मी चकित झाले, मला धक्काच बसला. मला कल्पनाच नव्हती की, क्रुणाल असलं काही रोमँटीक करेल.”