धुळे : बंदुकीच्या धाकाने व्यापार्‍याकडील लाखो रूपये लुटले

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – बंदुकीच्या धाकाने व्यापाऱ्याकडील लाखो रुपये लुटून चोरटे पसार झाल्याची घडना गोंदुर रोडवर घडली आहे. याप्रकरणी व्यापारी सोनवणे यांनी देवपुर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवपुरातील शनिमंदिर परिसरातील किरणा दुकानदार व्यापारी सोनवणे हे शनिवारी सायंकाळी गोंदुररोडवरुन दुचाकीने घरी येत होते. त्यांच्याकडे दिड लाख रुपये होते.  गोंदुर रस्त्यावरच अज्ञातांनी त्यांना अडवले आणि मारहाण करत बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील पैशांची बॅग हिसकावून चोरटे धुम स्टाईलने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच देवपुर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पहाणी केली. पुढील तपास पोसीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे करीत आहे.

दरम्यान, रस्त्यावर लूट होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शुक्रवारी देखील सोनगीर जवळ एका ट्रक चालकाला अज्ञात मोटरसायकल स्वारांनी अडवून मारहाण करुन रोख रक्कम लुटून नेली होती. या घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/