‘हनिमून पॉलिटिक्स’च्या वक्तव्यावरुन तेजपाल यादवसांचा थैयथयाट, म्हणाले – ‘पर्दाफाश करेन’

पटणा : वृत्तसंस्था – बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि हिंदुस्तान आवाम मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जीतन राम मांझी ( Jitan Ram Manjhi) यांनी राहुल गांधी, (Rahul Gandhi) बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, एलजेपी अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले होते. वेळ आली की तिघेही त्यांचा हनीमून साजरा करायला कुठं जातात की काय करतात याचा पत्ता नसतो असे मांझी म्हणाले होते. यावरुन तेजस्वी यांचे ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांनी जीतन राम मांझी यांना उतारवयात काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. तसेच यावेळी त्यांनी मांझी यांना बिंग फोडण्याची धमकी दिली आहे.

तेजप्रताप यादव म्हणाले, मांझी हे आमच्या शेजारी असलेल्या बंगल्यातच राहतात. त्यांच्या खोलीत काय काय होतं हे सर्व माहित आहे. तसेच त्यांनी उतारवयात काळजी करावी आणि वेळीच स्वत:ला सांभाळावं असंही म्हटलं आहे. जतीन राम मांझी यांनी केलेल्या हनिमून वक्तव्यावर विचारण्यात आलेल्या प्रश्नला तेजस्वी यादव यांनी उत्तर देणे टाळले. मात्र, त्यांचे ज्येष्ठ बंधू तेजप्रताप यादव यांनी जीतन राम मांझी यांच्या वक्तव्यावर पलवार केला.

तेजप्रताप यादव यांच्यावर पलटवार करताना हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रवक्ते दानिश रिझवान म्हणाले, तेजप्रताप यादव यांनी आपल्या कोणत्या अयोग्य सवयींमुळे त्यांची पत्नी ऐश्वर्या राय यांना घराबाहेर काढलं हे त्यांनी सांगावं. दिल्लीच्या फार्म हाऊसमध्ये कोणत्या कारणामुळे तेजप्रताप आणि तेजस्वी यादव यांना मारण्यात आलं होतं हे देखील सांगावं.तसेच तेजप्रताप यादव यांनी आपल्या मर्यादेत रहाव, असा इशारा देताना म्हटले, आम्ही त्यांचं बिंग फोडलं तर लालू प्रसाद यादव यांची मुलं रस्त्यावर येतील.

काय म्हणाले जीतन राम मांझी ?
जीतन राम मांझी यांनी म्हटलं आहे की, भारताचे, बिहारचे जे तीन युवराज आहेत, मग ते राहुल गांधी असोत, चिराग पासवान असोत किंवा तेजस्वी यादव असोत. वेळ आली की तिघेही त्यांचा हनीमून साजरा करायला कुठं जातात की काय करतात याचा पत्ता नसतो, असे वादग्रस्त वक्तव्य मांझी यांनी केले. मांझी यांच्या निवासस्थानी हिंदुस्तान आवाम मोर्चाची बैठक झाली. यावेळी त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं.