लासलगाव : बारदाना शिलाई काम करणार्‍या महिला संपावर

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन (राकेश बोरा) – कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगांव शहरामध्ये बारदाना पिशवीचे शिलाई काम करुण हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असतो. मात्र मिळणाऱ्या शिलाईच्या दर परवडत नसल्याने येथील हजारो महिलांनी काम बंद आंदोलन केले आहे. लासलगाव सह जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत असताना दुसरीकडे कांदा गोणी शिलाई करणाऱ्या मजूर वर्गाने काम बंद आंदोलन पुकारल्याने कांदा हा देशांतर्गत बाजारपेठेत पाठवण्यासाठी त्यांना पिशवीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कांदा साठवणुकीत ची असलेली मर्यादा लक्षात घेता कांदा व्यापाऱ्यांना कांदा व्यापार करणे अवघड होणार आहे. घाऊक व्यापार यावर 25 टन तर किरकोळ व्यापार यावर 2 टन कांदा साठवणुकीची असलेली मर्यादा लक्षात घेता यावर लवकर तोडगा निघणे आवश्यक आहे. सदरचा तोडगा लवकर न निघाल्यास याचा फटका थेट कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याचे चिन्ह निर्माण होणार आहे.

येथील बारदाना पिशवी शिलाईचे काम करणाऱ्या महिलांनी शिलाई मजुरीत वाढ करून मिळावी, या मागणीसाठी बारदाना शिवण कामगार महिलांनी लासलगाव येथे बाजार समितीत सभापती सुवर्णा जगताप यांना निवेदन देवून शिलाई मजुरी वाढून मिळण्या संदर्भात चर्चा केली. सध्या या मजुरांना शंभर गोणी शिवण्यासाठी 50 रुपये मजुरी देण्यात येते. वाढत्या महागाईत ही मजुरी परवडत नसल्यामुळेच मजुरीत वाढ करून मिळावी, असे लासलगाव, ब्राह्मणगाव (विंचूर) पिंपळगाव नजिक परिसरातील महिलांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

भाव वाढ प्रश्नावर बारदाना शिलाई काम करणाऱ्या महिला सात दिवसा पासून संपावर आहेत.या प्रश्नावर चर्चा करण्याकरिता लासलगाव बाजार समिती च्या सभागृहात बाजार समिती च्या सभापती सुवर्णा जगताप यांनी या वेळी सांगितले बारदाना दुकानदार संघाचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावून याविषयी चर्चा करण्याचे आश्वासन दिले आणि काही मार्ग काढता येईल का त्यासंदर्भात चर्चा करण्याचे सांगितले.

बारदाना पिशवी शिलाईत शहरातील चार ते पाच हजार महिला काम करीत असून मागण्या मान्य न झाल्यास मोर्चा काढून आंदोलन करण्याचा इशाराही बारदाना शिवण कामगार महिलांच्या वतीने देण्यात आला आहे. या वेळी महिला कामगार प्रतिनिधी उषा विजय रणदिवे, सोनाली सचिन कर्डीले, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कुलकर्णी यांनी महिलांच्या शिलाई मजुरीत वाढ करून मिळावी म्हणून लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांना निवेदन दिले.

प्रतिक्रिया – त्रस्त महिला
दर दोन वर्षानंतर कांदा पिशवी शिलाई मजुरी पाच रुपये प्रति शेकडा वाढवण्याचे ठरलेली असतानाही तिसरं वर्ष उलटूनही आतापर्यंत मजुरीमध्ये वाढ झालेली नाही त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया – सुवर्णा जगताप,सभापती बाजार समिति
बारदाना दुकानदार संघाचे प्रतिनिधी यांची बैठक बोलावून याविषयी चर्चा करुण लवकरात लवकर समन्वयाने तोडगा काढन्यात येईल.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/