अनेक दिवसांच्या चढत्या दरांनंतर ‘सोने – चांदी’ आज ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफा बाजारात आज सोन्याने सामान्यांना थोडासा दिलासा दिला आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोने १०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यामुळे सोन्याचे भाव १० ग्रॅम मागे ३८,५७० रुपये झाले आहेत. भारतीय सराफा बाजारात शनिवारी सोन्याचे दर ३८,६७० रुपये प्रति १० ग्रॅम होते. याशिवाय भाव वधारलेल्या चांदीने देखील दिलासा दिला असून ५० रुपयांनी चांदी स्वस्त झाली आहे.

सध्या सराफा बाजारात चांदीचे भाव ४५,००० रुपये प्रति किलो आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात ०.९८ टक्के कपात झाल्याने १४९९ डॉलर प्रति औंस सोन्याची किंमत आहे. तर चांदी १७ डॉलर प्रति औंस झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या व्यापारिक तणावामुळे सोन्याच्या दरात वाढ होत आहे. अमेरिका आणि चीनच्या व्यापार युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत उतार चढाव येत आहेत. याचा परिणाम देशातील सराफा बाजारावर होतं आहे.

दिल्लीत सोमवारी ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्ध सोने १०० – १०० रुपयांच्या कपातीमुळे ३८,५७० रुपये आणि ३८,४०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. सोन्याच्या भावात २५० रुपयांनी वाढ होऊन आता हे भाव ३८,६७० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. चांदी देखील चकाकली असून चांदीच्या भावात ३७० रुपयांनी वाढ झाली असून बाजारातील चांदीची किंमत ४५०५० रुपये प्रति किलोग्राम आहे.

आरोग्यविषयक वृत्त