विजय माल्याचा 17 ‘लक्झरी’ बेडरूमसह ‘नाइटक्लब’ असलेली मालमत्ता लिलाव करण्याची ‘या’ बँकेची इच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्योगपती विजय माल्याची फ्रान्सिस बेटावर असलेली लक्झरी बेडरूमची हवेली अनेक दिवसांपासून बेकार अवस्थेत पडून आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका मोठ्या बँकेने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की,माल्याची फ्रान्सिस बेटावरील इले सेंट मारगुएराइटवर 1.3 हेक्टर प्रॉपर्टी मोठ्या कालावधीपासून बेकार अवस्थेत पडून आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानुसार या हवेलीमध्ये चित्रपटगृह, हेलिपॅड आणि नाइटक्लबची देखील सुविधा आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यायालयाने एसबीआय समवेत इतर बँकांना विजय माल्याची प्रॉपर्टी विकून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले होते. माल्याने कतार नॅशनल बँक एसएक्यूच्या युनिट आणि CO कडून 30 मिलियन डॉलर (210 कोटी रुपये) कर्ज घेऊन हवेली खरेदी केली होती.

माल्याकडून कर्जाची परतफेड न होऊ शकल्याने बँकेने संपत्तीची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा रियल इस्टेट एजंटच्या माध्यमातून या प्रॉपर्टीच्या किमतीमध्ये दहा मिलियन युरोची घसरण झाल्याचे समोर आले.

सध्या कोठे आहे विजय माल्या
बँकांना फसवल्याप्रकरणी आरोपी असलेला विजय माल्या मार्च 2016 लाच लंडन येथे पळून गेला होता. त्याला पुन्हा भारतात आणण्यासाठी केंद्र सरकार आणि भारतीय तपास यंत्रणा प्रयत्न करत आहेत, परंतु अद्याप तरी त्यांना यश आलेले नाही.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/