Latur District Bank Election | काँग्रेसला झटका, लातूर जिल्हा बँक निवडणुकीत बाद ठरलेले विरोधाकांचे अर्ज वैध

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन –  Latur District Bank Election | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीपूर्वी (Latur District Bank Election) काँग्रेसला (Congress) मोठा झटका बसला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीअंती अवैध ठरवलेले भाजपच्या 9 उमेदवारांचे अर्ज सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधकाकडे झालेल्या सुनावणीत वैध (BJP candidates application valid) ठरले आहेत. यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून महाविकास आघाडीची (MVA Government) डोकेदुखी वाढली आहे.

 

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Latur District Bank Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी येत्या 21 नोव्हेंबर रोजी मतदान (Voting) होणार आहे.
या निवडणुकीसाठी (LDCC Latur Elections) भाजपच्या वतीने सर्व 19 जागांसाठी 35 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.
परंतु 10 ऑक्टोबर रोजी झालेल्या अर्जाच्या छाननीत भाजपच्या 9 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले होते.
या निर्णयाविरुद्ध भाजपने सहनिबंधक सहकारी संस्था लातूर (Co-operative Society Latur) यांच्याकडे अपील केलं होतं.

 

भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण

 

भाजपच्या अपीलावर सुनावणी होऊन अवैध ठरवण्यात आलेल्या 9 उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले.
काँग्रेसच्या राजकीय दबावात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अर्ज बाद करुन लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तसेच याबाबत राज्यपालांकडे (Governor) देखील भाजपने तक्रार केली होती.
या निर्णयामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार रमेश कराड (BJP MLA Ramesh Karad) म्हणाले,
सत्य परेशान हो सकता हैं पराजित नही असे म्हटले आहे.

 

सत्ताधाऱ्यांनी लोकशाहीचा खून केला

 

जिल्हाधिकारी (Collector) आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन आमचे अर्ज बाद करण्याचे षडयंत्र रचण्यात आले आहे.
सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद करुन लोकशाहीचा खून केल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
तसेच याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे संपर्क केला मात्र त्यांना आमचे फोन उचलले नाहीत. याप्रकरणी आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.
हे एक षडयंत्र असून यामध्ये जो कोणी सहभागी आहे त्याच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.

 

Web Title : Latur District Bank Election | latur district central co operative bank election big jolt to congress as opposition 9 application valid LDCC Latur Elections

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | मॉडेल कॉलनी भागातील दिव्यांग व्यक्तींना, सोसायटी वॉचमन व स्वच्छ संस्थेतील सदस्यांना भाजपकडून सरंजाम व दिवाळी किटची भेट

Supriya Sule | ‘इंदापुरात मी पाटलांना घाबरतो’ राज्यमंत्री दत्तात्रय भरणेंच्या वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंची टोलेबाजी, म्हणाल्या…

Petrol Diesel Price | लवकरच 60 रुपये प्रति लीटर इंधनात धावणार तुमची कार! मोदी सरकारची विशेष योजना, जाणून घ्या सविस्तर