पुण्यातील प्रसिद्ध वकीलाचा ‘डर्टी पिक्चर’ ! सहमतीने ‘सेक्स’ करताना बेडरुममध्ये ‘स्पाय कॅमेरा’ लावून ‘शूटिंग’, तिघांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सहमतीने शारिरीक संबंध ठेवत असताना बेडरुममध्ये ‘स्पाय कॅमेरा’ लावून त्यावर त्याचे चित्रिकरण करुन ते महिलेच्या मित्राला दाखविले. तसेच त्याचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातील प्रसिद्ध वकील व त्यांचे महिला अशील आणि एकावर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अ‍ॅड. अभिजित सरवटे, त्यांचे अशील महिला व या महिलेला बेडरुममध्ये कॅमेरा बसविण्यासाठी मदत करणारा मित्र अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका ३३ वर्षाच्या महिलेने सांगवी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. तिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ३५४, ५०७, १२०, आय टी अ‍ॅक्ट ६६, ६७ खाली गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार पिंपळे निलख परिसरातील एक फ्लॅटमध्ये २०१६ पासून सुरु होता.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला हिचे एका मित्राबरोबर शारीरिक संबंध होते. त्याचे चित्रण करण्यासाठी आरोपींनी मिळून कट करुन त्यांच्या बेडरुममध्ये स्पाय कॅमेरा बसविला. त्यानंतर फिर्यादी आणि तिचा मित्र यांच्या नकळत चित्रित करुन त्याचे रेकाॅर्डिंग तयार केले. त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर पसरविण्याची फिर्यादीचे मित्रांना धमकी दिली. फिर्यादीच्या खासगी जीवनातील खाजगीकृत्य चित्रित करुन ते पसरवून फिर्यादीच्या ओळखीच्या प्रतिष्ठित लोकांना दाखविले. त्यांनी फिर्यादी महिलेला सांगितले की फिर्यादीची खाजगी कृत्ये ही चित्रित केली आहेत, असे या महिलेला समजल्याने त्यांच्यासमोर जाताना तिच्या मनात लज्जा निर्माण होऊ लागली. तसेच त्यांनी काढलेले व्हिडिओ हे सोशल मिडियावर पसरु नये, म्हणून फिर्यादीच्या मित्राकडे मोठ्या रक्कमेची मागणी केली, असे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानुसार सांगवी पोलिसांनी अ‍ॅड. अभिजित सरवटे व त्यांच्या महिला अशील आणि कॅमेरा बसविणारा अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महिला सहायक पोलीस निरीक्षक गवळी अधिक तपास करीत आहेत. अ‍ॅड. अभिजित सरवटे हे पुण्यातील प्रसिद्ध वकिल असून त्यांचे प्रभात रोडवर कार्यालय आहे. अशा प्रकारे त्यांच्यावर आणि त्यांच्या अशिलावर गुन्हा दाखल झाल्याने पुण्यातील वकिल वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.

Visit : policenama.com