सिगारेट चोरीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला LCB कडून अटक

शिक्रापुर :  प्रतिनिधी –    पुणे जिल्ह्याच्या शिक्रापुर येथून पिकअप मधील सिगारेटचा सहा लाख 19 हजार रुपयाचा माल चोरी प्रकरणी हवा असलेल्या चोरट्याला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला एक वर्षानंतर सापळा रचून पकडण्यात यश आले आहे

विशाल शांताराम कुऱ्हाडे (वय 24 वर्षे, रा पिंपरखेड ता शिरुर जि पुणे) असे वर्षभर फरार असलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी दिलेली माहिती नुसार दि 10 ऑगस्ट 2019 रोजी शिक्रापूर गावचे हद्दीत फिर्यादी म्हस्के यांनी त्यांचे ताब्यातील पिकअप गाडी नं MH 12 QW 3947 मध्ये सिगारेट चा माल भरून घरासमोर गाडी पार्क केली होती. सदर पिकअप गाडीतून 6,19,951/- रु किंमतीचा सिगारेटचा माल चोरी गेला होता, याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्यात यापूर्वी तीन आरोपीना अटक करण्यात आलेले असून आरोपी विशाल शांताराम कुऱ्हाडे (वय 24 वर्षे, रा पिंपरखेड ता शिरुर जि पुणे) हा माञ वर्षभरापासून फरार होता.

गोपनीय बातमीदाराकडून आरोपी रांजणगाव गणपती परिसरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाला मिळाली होती. पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट ,सपोनि. पृथ्वीराज ताटे, सहा फौजदार दत्तात्रय गिरमकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पोना मंगेश थिगळे, पोना जनार्दन शेळके, पोना अजित भुजबळ, यांंच्या पथकाने रांजणगाव परिसरात सापळा रचून फरारी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास करिता शिक्रापूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.