Coronavirus :’हे’ मोबाईल App तुमचा ‘कोरोना’पासून बचाव करू शकतं, जाणून घ्या

दिल्ली :  पोलीसनामा ऑनलाइन   –   जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला आहे. कोरोनापासून स्वतःला लांब ठेवण्याचे अनेक उपाय आहे. त्यामध्ये महत्वाचा उपाय म्हणजे वारंवार हात धुणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे. मात्र हे सगळे सवयीनमध्ये नसल्याने विसरून आपण वारंवार हात धुण्यास विसरतो यावर उपाय म्हणून मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुम्हाला हात धुवायचे आहे, सोशल डिस्टेन्सिंग ठेवायचं आहे, याची आठवण करून देणार आहे एक मोबाइल अॅप . एक मोबाईल अँप याची वारंवार आठवण करून देणार आहे त्यामुळे कोरोनापासून लांब राहण्यास मदत होणार आहे. दिल्लीतल्या इंद्रप्रस्थ ऑफ इन्फेर्मशन अँड टेक्नॉलॉजी या इंस्टीट्युटने कोरोनाशी लढण्यासाठी हे अँप बनवले आहे. आणि या अँपल युनिक असे नाव देण्यात आले आहे. मोबाईल अपाचे नाव आहे वॉशकरो कोरोनाव्हायरस आणि त्यापासून बचाव करण्याचे मार्ग याबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या गाईडलाईन लक्षात घेऊन हे अॅप विकसित करण्यात आलं आहे. सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषेत हे अॅप उपलब्ध आहे. लवकरच पंजाबी, उर्दू, तामिळ आणि तेलगू भाषेतही हे अँप लाँच केलं जाणार आहे, अशी माहिती इंद्रप्रस्थ ऑफ इन्फर्मेशन अँड टेक्नोलोंजि ने दिली

या इन्स्टिट्यूट मधील कंप्युटेशनल बायोलॉजी प्रोफेसर तवप्रितेश सेठी आणि कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक पोन्नूरंगम कुमारगुरू यांनी एकत्रितरित्या हे अॅप तयार केलं आहे. प्रा. सेठी यांनी सांगितलं, “हे अॅप तुम्हाला वारंवार हात धुण्याबाबत आठवण करून देईल. सोबतच कोरोनासंबंधी गैरसमज आणि चुकीच्या माहितीपासूनही दूर ठेवेल” तसेच “यामध्ये सिस्टीम ट्रॅकर आहे, ज्यामुळे हे अॅप वापरणाऱ्यांमध्ये कोरोनाव्हायरसच्या लक्षणांची माहिती मिळू शकेल. जेणेकरून तुम्ही वेळेत टेस्ट कराल आणि सुरक्षित राहू शकाल. कोरोनाव्हायरससंबंधी तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरंही तुम्हाला या अॅपमार्फत मिळतील. यावर चॅटबोटची सुविधाही उपलब्ध आहे, जी तुम्हाला सरकारी वॉट्सअॅप हेल्पलाइन नंबरशी जोडते” अशी माहिती प्रा. सेठी यांनी दिली प्रा. कुमारगुरू यांनी सांगतिलं, “जर तुम्ही सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं, तरीदेखील हे अॅप तुम्हाला सिग्नल देणार. कोरोनासंबंधित अपडेट्स ऑडिओ फॉरमेटमध्ये माहिती हे अँप तुम्हाला देऊ शकणार आहे.

एकंदरीतच वॉशकरो हे मोबाईल अँप कोरोनापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठीच्या उपाययोजनांचे सिग्नल वेळोवेळी देतो.