Live शुटींगमध्ये वहिदा रहमाननं ‘बिग बीं’ना मारली होती ‘थप्पड’, ‘अशी’ होती अमिताभची रिअ‍ॅक्शन ! (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन आणि लेजेंड लेडी वहीदा रहमान यांचा एक जुना किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. खुद्द वहीदा रहमान यांनीचा याबाबत खुलासा केला आहे.

वहीद रहमान यांनी बिग बी अमिताभ बच्चन यांना थप्पड मारल्याचा किस्सा सांगितला आहे. ही गोष्ट आहे 1971 साली आलेल्या रेशमा और शेरा या सिनेमाच्या शुटींगदरम्यानचा. सिनेमाच्या एका सीनमध्ये वहीदा बिग बींना थप्पड मारणार होत्या. त्यांनी बिग बींना अशी थप्पड मारली की, बिग बींना प्रत्यक्षात मारल्यासारखीच वाटली होती. हाच किस्सा वहीदा यांनी कपिल शर्मा शो या कॉमेडी शोमध्ये सांगितला आहे. याचा एक प्रोमो व्हिडीओ देखील समोर आला आहे जो व्हायरल होत आहे.

सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा अभिनेता संजय दत्तचे वडिल सुनील दत्त यांनी डायरेक्ट केला होता. हा एक क्राईम ड्रामा सिनेमा होता. या सिनेमात वहीदा आणि बिग बी यांच्या व्यतिरीक्त दिवंगत विनोद खन्ना आणि अमरीश पुरी हेही कलाकार होते. सिनेमात संजय दत्तही चाईल्ड आर्टीस्ट म्हणून दिसला होता. या सिनेमातील सादरीकरणासाठी वहीदा यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like