राज्यात 15 ऑक्टोबरला विधानसभेची निवडणूक ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभेसाठी सर्व पक्षांनी रणशिंग फुंकले असताना आता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी विधानसभा निवडणूकीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 15 ऑक्टोबरला राज्यात निवडणूक होणार असून गणेशोत्सवानंतर राज्यात निवडणूकीनिमित्त आचारसंहिता लागू होईल असा अंदाज वर्तवला आहे. भाजप निवडणूकीसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे दिवाळी आधीच राज्यात नवे सरकार सत्ता स्थापन होणार अशी चर्चा रंगली आहे.

अर्थमंत्री सुधीर मुंगटीवार यांनी निवडणूकीच्या तारखा फोडल्या आहेत असे मानले जात आहे. राज्यात येऊ घातलेल्या निवडणूकांच्या तारखांची चर्चा सध्या रंगली आहे. परंतू सुधीर मुंगटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात विधानसभा निवडणूका येत्या 15 ऑक्टोबरला पार पडतील आणि त्यासाठी गणेशोत्सवानंतर अचारसंहिता लागू होईल.

राज्यातील सर्वात पक्ष विधानसभेसाठी तयारी करत आहेत. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे. भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेकडून अनेक यात्रा काढण्यात येत आहे. राज्यात निवडणूकीचे वारे जोमाने वाहत आहेत. निवडणूकीच्या तारखांच्या वावड्या बऱ्याचदा उठत आहे, परंतू निवडणूक आयोगाकडून अजूनही निवडणूकीची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आरोग्यविषयक वृत्त –