बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद (व्हिडीओ)

पुणे (आंबेगाव) : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे ग्रामीण परिसरामध्ये बिबट्यांची दहशत असून हे बिबटे मानवी वस्तीत येऊन जनावरांची शिकार करत आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचा वावर असून मागील काही दिवसांपासून एका बिबट्याने आपली दहशत निर्माण केली आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांनी या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव या ठिकाणी बिबट्याने शेतकऱ्याच्या घरासमोरील पाळीव कुत्र्यावर हल्ला केला. बिबट्याने केलेला हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

हा प्रकार रविवार (दि.२५) पहाटे तीनच्या सुमारास घडला. बिबट्याने लाखनगावातील शेतकरी सतीश रोडे यांनी त्यांचा पाळीव कुत्रा घरासमोर झोपला होता. त्यावेळी आलेल्या बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. बिबट्याने कुत्र्यावर केलेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला असून या परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.

रोडे यांचा पाळीव कुत्रा घराबाहेर झोपला असताना अंधारातून एक बिबट्या येताना सीसीटीव्हीत दिसत आहे. हा बिबट्या एका दुचाकीच्या आडून कुत्र्याच्या दिशेने येताना दिसत आहे. यामध्ये बिबट्या सावकाश पावले टाकत कुत्र्याच्या दिशेने येत असून त्याने झोपलेल्या कुत्र्याच्या जवळ जाऊन त्याच्यावर पंजाने हल्ला करताना दिसते. कुत्रा बिबट्याच्या अंगावर धाऊन जात आपली सुटका करून घेत तेथून पळून जाताना सीसीटीव्हीत दिसत आहे. कुत्र्याच्या गळ्यात असलेल्या चुकांच्या पट्ट्यामुळे त्याचा जीव वाचला.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like