Leopard in Pune | पुण्यातील विश्रांतवाडीतील DRDO संस्थेत बिबट्याचा वावर ?, परिसरात प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Leopard in Pune | पुण्यातील विश्रांतवाडीतील लष्कराच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले. संस्थेच्या आवारात बिबट्याचा वावर (Leopard in Pune) असल्याचे सीसीटीव्हीत फुटेजमध्ये आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी पहाटे बिबट्या शिरल्याचे संस्थेच्या निरीक्षण मनोऱ्यावर असलेल्या जवानाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने याबाबत वनविभागाला (Forest Department) माहिती दिली.

 

डीआरडीओच्या आवारात बिबट्या शिरल्याची माहिती (Leopard in Pune) परिसरात पसरताच एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच वनविभाग आणि बावधन येथील रेस्क्यु संस्थेची पथकं (Rescue Team) डीआरडीओमध्ये दाखल झाले आहेत. बिबट्याच्या हालाचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या परिसरात कॅमेरे बसवण्यात आले आहेत. संस्थेच्या आवारात झाडी मोठ्या प्रमाणात आणि दाट असल्यामुळे बिबट्याचा शोध घेण्यास अडचणी येत असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील (Rahul Patil) यांनी सांगितले. बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. तसेच बिबट्या दिसून आल्यास वनपरिक्षेत्र कार्यालयाला (Forest Range Office) कळवावे किंवा टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

 

दरम्यान, मांजरीतील सीरम कंपनीजवळ असलेल्या वस्तीत बिबट्या शिरल्याची घटना घडली होती.
दोन वर्षांपूर्वी मुंढव्यातील नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात बिबट्या शिरला होता.
खेड आणि हवेली तालुक्यात बिबट्याचा वावर आहे. आळंदीपासून काही अंतरावर असलेल्या फुलगाव परिसरातून बिबट्या या परिसरात आल्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Leopard in Pune | Leopard in DRDO Vishrantwadi in Pune a huge excitement in the area

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा