पुण्यातील सांगवीत बिबट्याचे दर्शन ; परिसरात खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन (कुणाल गोहीरे) – पिंपरी-चिंचवड येथील सांगवी परिसरालगतच्या संरक्षण खात्याच्या सीक्यूएई परिसरातील जंगलात रविवारी पहाटे (12 मे) व सोमवारी (13 मे) सकाळी बिबट्याचा वावर झाल्याचे निदर्शनास आले आहे.

सांगवी फाटा व संरक्षण खात्याच्या कार्यालयाच्या परिसरातील जागेत जंगल आहे. सीक्यूएईतील कर्मचारींना तसेच संरक्षण खात्याच्या आसपास असलेल्या जूनी सांगवीतील मधूबन, पिंपळे निळख व जिल्हा रुग्णालय वसाहत परिसरातील नागरीकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भातील सीक्यूएई प्रशासनाकडून अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

औंध कॅम्प, नवी व जूनी सांगवीला परिसर चौबाजूने नदी व संरक्षण खात्याच्या जागा आहेत. त्यातील काही भागात जंगल भागही आहे. दरम्यान, वन विभागालाही सीक्यूएई प्रशासनकडून ही गंभीर बाब कळवण्यात आली असून वन विभागाकडून लवकरच बिबट्याला पकडण्यासाठी येथील परिसरात ठिकठीकाणी पिंजरा लावण्यात येणार असल्याची माहिती सीक्यूएई प्रशासन अधिकारी डी. पी. सना यांनी दिली आहे.

You might also like