सोमय्या यांना एकदाच शिवसेना स्टाइलनं उत्तर देऊ, अनिल परब यांचा कडक इशारा

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अर्णब गोस्वामी प्रकरणावरून गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे विकोपाला गेले आहेत. या प्रकरणावरून भाजपचे नेते सातत्याने लक्ष करत असल्याने आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका संपू द्या मग आम्ही एकदा असताना शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा शिवसेना नेते अनिल परब यांनी दिला आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे कुटुंबामध्ये टीकास्त्र सोडलं. दरम्यान, शिवसेना नेते अनिल परब यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की किरीट सोमय्या यांनी सुरू केलेली रोपांची मालिका आधी संपू द्या. मग आम्ही त्या रोपांची चिरफाड करू. दिवाळीचे चार दिवस संपू द्या. मग त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल तसेच आता आम्ही जे आरोप करू ते सहन करण्याची तयारी किरीट सोमय्या यांनी ठेवावी.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबावर केलेले आरोप
दोन कोटी 55 लाखांमध्ये जी जमीन अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली. ती ठाकरे सरकार, मुंबई महापालिका 900 कोटीत घ्यायला निघाले. त्यासाठी 345 कोटी दिले. अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाचे संबंध काय? नऊ सातबारे पुरावे म्हणून देतो, नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्यात 30 जमिनीचे व्यवहार, रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेल्या 40 जमीन व्यवहारांपैकी तब्बल 30 नाईक कुटुंबासोबत केले. रवींद्र वायकरांसोबत काय आर्थिक संबंध आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी किंवा रश्मी ठाकरे यांच्या प्रतिनिधींनी उत्तर द्यावे, वायकरांसोबत बिझनेस पार्टनरशीप आहे का? ठाकरे सरकारच्या सातबाऱ्यामध्ये संबंधित जमीन लागवड योग्य नसल्याचं लिहीलं आहे. नाईक आणि ठाकरे यांच्यात काय आर्थिक हितसंबंध आहेत, हे समजलं पाहिजे.

किरीट सोमय्या यांच्या आरोपावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…
किरीट सोमय्या यांनी आरोप केले म्हणजे मी आरोपी होत नाही. किरीट सोमय्या यांना केवळ आरोप करण्यासाठी नेमलं आहे. कुठलीही जनहित याचिका केली तरी आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहो. त्यांनी आरोप केले त्यावर उत्तर देत बसणार नाही. आम्हाला आमची काम करून द्यावीत. आरोप सिद्ध करावे. सोमय्या हे महाभारतातले शिखंडी आहेत. उच्च न्यायालयात आम्ही रीतसर कागदपत्रे सादर करू.