अनिल अंबानींमुळं ‘घाबरली’ LIC, हजारो कोटी बुडण्याचा ‘धोका’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अनिल अंबानी समूहाच्या कंपन्या आणि डीएचएफएलला कर्ज देणे एलआयसीला भारी पडत असल्याचे दिसून येत आहे. सरकारी विमा कंपनी एलआयसीने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले की, मार्च २०१९ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात संशयास्पद मालमत्तेची तरतूद ३० टक्क्यांनी वाढून २३,७६० कोटी रुपयांवर गेली आहे.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनीचे हे कर्जही डुबण्याचीही शक्यता आहे. रिअल इस्टेट, कर्ज आणि इतर मालमत्तांमध्ये गुंतवणूकीच्या मालमत्ता गुणवत्तेची आणि कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर एलआयसीने तरतूद वाढवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, एलआयसीचे लोन अनेक संकटग्रस्त कंपन्यांकडे आहे, ज्यात दीवान हाउसिंग फायनान्स लिमिटेड किंवा डीएचएएफएल, इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग आणि अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपच्या कंपन्यांचा समावेश आहे.

२०१८-१९ साठी १८,१९५ कोटींची तरतूद :
एलआयसीने यापूर्वी सन २०१८ – १९ या आर्थिक वर्षासाठी १८,१९५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. कंपनीचा सकल एनपीए गुणोत्तरही २०१७ – १८ मध्ये ६.२३ टक्क्यांवर आला असून २०१८ – १९ मध्ये ६.१५ टक्के होता. दरम्यान, एलआयसीचे निव्वळ एनपीए प्रमाणही १.८२ टक्क्यांवरून ०.२७ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. ३१ मार्च रोजी एकूण ४ कोटी रुपये दिलेल्या कर्जत एलआयसीच्या एनपीएची रक्कम २४, ७७७ कोटी होती. यापैकी संशयित मालमत्ता १६,६९० कोटी रुपये, तोटा मालमत्ता ६,७२२ कोटी आणि उप-मानक मालमत्ता १,३१२ कोटी रुपये होती.

बँकांचे एनपीए वाढण्याची शक्यता:
गेल्या शुक्रवारी आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले की, येत्या ९ महिन्यांत बँकांचे एनपीए वाढू शकतात. आरबीआयने अर्थव्यवस्थेतील मंदी, कर्जाची भरपाई न करणे आणि पत वाढीमधील घट दर्शविली. आरबीआयच्या मते बँकांचे एनपीए सप्टेंबर २०२० पर्यंत ९.९ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतात, जे सप्टेंबर २०१९ पर्यंत ९.३ टक्के होते. तसेच टीयर -1 भांडवलाची उपलब्धता उच्च एनपीए गुणोत्तर असलेल्या बँकांसाठी मर्यादित राहील, अश्या सूचनाही आरबीआयने आपल्या अहवालात दिल्या आहेत.

बँकांची अवस्था :
आरबीआयने आपल्या अहवालात म्हटले की, सप्टेंबर २०१९ मध्ये २४ बँकांचे एकूण एनपीए प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी होते, तर ४ बँकांमध्ये हे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा जास्त होते. सप्टेंबर २०२० पर्यंत राज्य सरकारी बँकांचे सकल एनपीए प्रमाण १३.२ टक्के, खासगी बँकाचे ४.२ टक्के आणि विदेशी बँकाचे ३.१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. ३० सप्टेंबर रोजी क्रेडिट ग्रोथ ८.९ टक्क्यांवर आली आहे, तर खासगी बँकांनी याच काळात १६.५ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/