LIC IPO | जर तुमच्याकडे LIC चा विमा असेल तर IPO 5% मिळू शकतो ‘स्वस्त’, मार्चमध्ये येईल इश्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC IPO | देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी LIC चा इश्यू मार्च 2022 मध्ये येणार आहे. कंपनी या आठवड्यात इश्यूसाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) मसुदा सादर करणार आहे. ज्यांच्याकडे LIC विमा आहे त्यांना सवलतीत IPO मिळू शकेल अशी अपेक्षा आहे. ET च्या मते, काही सूत्रांनी सांगितले आहे की एलआयसीच्या पॉलिसीधारकांना 5% कमी दराने Initial Public Offering (IPO) मिळू शकतो. (LIC IPO)

 

एलआयसी त्यांच्या आयपीओसाठी 10 फेब्रुवारी रोजी SEBI कडे DRHP सादर करणार आहे. ईटीच्या म्हणण्यानुसार, इतर काही सूत्रांनी सांगितले की हा इश्यू किरकोळ गुंतवणूकदार आणि कंपनीच्या कर्मचार्‍यांना काही सवलतीत देखील उपलब्ध होऊ शकतो. मात्र, ही सवलत किती असेल हे अद्याप समजू शकलेले नाही.

 

गेल्या आठवड्यात, डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अँड पब्लिक असेट मॅनेजमेंटचे (DIPAM) सेक्रेटरी तुहिन कांत पांडे यांनी सूचित केले होते की एलआयसी या आठवड्यात इश्यूसाठी अर्ज सादर करू शकते.

 

पांडे यांनी अलीकडेच रॉयटर्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की एलआयसीचे मूल्य 5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते.
आणि तिची एंटरप्राईज व्हॅल्यू यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असू शकते. एलआयसीचा डीआरएचपी जमा केल्यानंतर
कळेल की सरकारला आपला एलआयसीमधील किती हिस्सा विकायचा आहे.

 

 

Web Title :- LIC IPO | lic ipo policyholders may get 5 percent discount in ipo issue to be launch in march 2022

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane | आमदार नितेश राणेंना मोठा दिलासा, न्यायालयाकडून ‘या’ अटीशर्थींसह जामीन मंजूर

 

Pune Crime | पुण्यातील नगर रोडच्या एस. एस. टोळीच्या म्होरक्यासह 23 सदस्यांवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

 

Multibagger Stock | 4 रुपयांवरून रू. 2,439 वर पोहचला Tata Group चा हा शेयर, गुंतवणुकदारांच्या 1 लाखाचे केले रू. 5.70 कोटी, तुमच्याकडे आहे का?