‘या’ सरकारी विमा योजनेच्या विमाधारकांनाही असेल, LIC च्या IPO मध्ये सवलतीचा अधिकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – LIC IPO | एलआयसी आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना सवलत देण्याबाबत, एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार म्हणाले की, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या विमाधारकांनाही आयपीओमध्ये सवलतीचा लाभ मिळेल. 10 फेब्रुवारी रोजी, सरकारने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे LIC IPO च्या मंजुरीसाठी ड्राफ्ट पेपर सादर केले आहेत.

 

एलआयसी आगामी IPO मध्ये विमाधारकांना 10% आरक्षणाखाली सवलत देऊ शकते. मात्र, ही सवलत किती असेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

माध्यमांशी बोलताना एलआयसीचे अध्यक्ष म्हणाले की, मला हे स्पष्ट करायचे आहे की प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत आमचे सर्व विमाधारक IPO सूट मिळण्यास पात्र असतील.

 

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना भारत सरकारने 2015 मध्ये लाँच केली होती. या योजनेंतर्गत, 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींना रू. 330 च्या वार्षिक प्रीमियमच्या आधारावर कोणत्याही स्थितीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. ही योजना एलआयसी आणि इतर विमा कंपन्यांद्वारे बँकांशी करार करून सरकारने निश्चित केलेल्या अटींसह लोकांना दिली जाते. (LIC IPO)

मार्चमध्ये IPO येण्याची शक्यता :
एलआयसीचे अध्यक्ष एमआर कुमार म्हणाले की, आयपीओची मंजुरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सेबीकडून मिळू शकते, त्यानंतर मार्चच्या अखेरीस आयपीओ येऊ शकतो.
मात्र, मूल्यांकनाबाबत त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.
ड्राफ्ट पेपरनुसार, सरकार एलआयसीचा 5% हिस्सा बाजारात विकू शकते.

 

एलआयसीच्या भविष्याविषयी, अध्यक्ष म्हणाले की,
जर कंपनीला पुढील वाढीसाठी भांडवल हवे असेल तर आम्ही केवळ सरकारकडेच नाही तर आमच्या भागधारकांशी देखील संपर्क साधू.

 

देशातील सर्वात मोठा आयपीओ :
एलआयसीचा आयपीओ हा देशातील सर्वात मोठा आयपीओ असेल.
मीडिया रिपोर्टनुसार, सरकार एलआयसीच्या 5% शेअरच्या बदल्यात 63000 कोटी रुपये उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे.
आतापर्यंत, देशातील सर्वात मोठा आयपीओ ऑनलाइन पेमेंट कंपनी पेटीएमचा आहे,
ज्याने नोव्हेंबर 2021 मध्ये शेअर बाजारातून आयपीओद्वारे 18,300 कोटी रुपये उभे केले होते.

 

Web Title :- LIC IPO | lic ipo update pmjjby holders subscribers eligible for lic ipo reservation

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा