Radiotherapy | आता कर्करोगावरील अत्याधुनिक उपचाराने हृदयविकारही बरा होणार; जाणून घ्या कसे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Radiotherapy | अतिशय घातक असलेल्या हृदयविकार (Heart Arrhythmia) असलेल्या रुग्णांसाठी एक खुषखबर आहे. आता एका नव्या रेडिओथेरपी तंत्रज्ञानामुळे (Radiotherapy Technology) हृदयविकार बरा होऊ शकणार आहे. सध्या या रेडियोथेरपीचा उपयोग कर्करोगासाठी (Cancer) केला जातो.

 

या प्रक्रियेत अतिशय तेज असलेले फोटॉन एक्स रे किरण (Photon X-Ray) असतात. त्यांना हृदयगती व्यवस्थित राहण्यासाठी हृदयाजवळ वापरले जाते. यात जोखिम असते. ही पद्धत वापरली गेलेल्या रुग्णांमध्ये हृदयाबाबतच्या तक्रारी कमी झालेल्या आढळल्या. हे परिणाम खुप पॉझिटिव्ह असल्याचे लंडनचे कार्डियोलॉजिस्ट प्रा. मार्क ओनिल (Cardiologist Prof. Mark O’Neill) यांनी सांगितले. स्टीरियोटैक्टिक एब्लेटिव रेडियोथेरपीचा (एसएबीआर) (Stereotactic Ablative Radiotherapy, SABR) तीव्र डोस दिला जातो.

 

यामुळे फुफ्फूस (Lungs) आणि यकृतातील (Liver) ट्युमर निकामी होतात.
साधारणपणे कर्करोगावर उपचार करणारे डॉक्टर हृदयाला जखम होऊ नये, मह्णून खबरदारी घेत असतात.
मात्र, या उपचारपद्धतीत हृदयालाच टार्गेट केले जात आहे. या उपचार पद्धतीचा वापर करण्यात येऊन बरे झालेल्या रुग्णांचे अनुभव फार काही सांगून जातात.
ब्रिटनमध्ये हृदयविकाराचे रुग्ण २० लाखांपेक्षा अधिक आहेत. त्यामुळे या उपचारपद्धतीने (Radiotherapy) येथे एक आशेचा किरण दिसत आहे.

 

Web Title :- Radiotherapy | now new radiotherapy technique will treat heart diseases till now it was used in cancer

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nitesh Rane | दिशा सॅलियनला घरी सोडणारी कार सचिन वाझेची? भाजप नेत्याच्या दाव्याने सर्वत्र उडाली खळबळ

Ahmednagar Crime | ‘बिग मी इंडिया’चा पुण्यातील 62 जणांना 7 कोटींना गंडा, अहमदनगर पोलिसांच्या तपासात निष्पन्न

 

Economic Offences Wing (EoW) Raid | खाण विभागाच्या उपसंचालकांच्या घरावर छापे