LIC IPO | एलआयसीच्या पॉलिसीधारकांना IPO मध्ये किती मिळणार लाभ? सगळ्यात आधी करा ‘हे’ काम पूर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भारताची सर्वात मोठी असणारी कंपनी म्हणजे जीवन बीमा निगम (LIC IPO) आहे. LIC आपल्या सर्व ग्राहकांना अनेक वेगवेगळ्या सुविधा अथवा लाभदायक योजना (Plan) आखत असते. दरम्यान आयपीओ हा गुंतवणूकदारांसाठी मिळवण्याचे मोठे साधण असते. एलआयसीचा (LIC IPO) मेगा आयपीओ मार्च अखेरपर्यंत येऊ शकणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

 

सरकारने पॉलिसीधारकांसाठी LIC IPO मध्ये 10 टक्के हिस्सा राखून ठेवला आहे. तर, एलआयसी पॉलिसीधारकांना IPO मध्ये 10 टक्के वेगळा कोटा राखून म्हणजेच त्यांना शेअर्स मिळण्याची जादा शक्यता असेल. परंतु, आता त्यांना या वेगळ्या कोटाचा लाभ कसा मिळणार ? हा सवाल उपस्थित होतो आहे. डिमॅट खाते असलेले अनेक LIC पॉलिसीधारक असा सवाल करीत आहे की, आम्हाला शेअर्स मिळवण्यासाठी काय करावं लागेल ? याबाबत जाणून घ्या.

 

PAN Card लिंक असणे आवश्यक –
एलआयसीच्या (LIC ) वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, त्यांना प्रथम LIC च्या साइटवर त्यांचा PAN अपडेट करावा लागणार आहे. LIC ने त्यांच्या पब्लिक नोटीसमध्ये सांगितलं आहे की, ‘आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी, पॉलिसीधारकांना कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्यांचा पॅन बरोबर असल्याची खात्री करावी लागणार आहे.’ त्याचबरोबर भारतातील कोणत्याही IPO मध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे बंधनकारक आहे.

 

PAN Card लिंक करण्याची पद्धत –

सर्व प्रथम एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट https://licindia.in/ वर जा.

येथे तुम्हाला ऑनलाइन PAN नोंदणीचा ऑप्शन मिळेल. तो निवडा

ऑनलाइन पॅन नोंदणीचे पेज उघडताच, proceed या ऑप्शनवर क्लिक करा.

त्यानंतर नोंदणी पेजवरील proceed या ऑप्शनवर क्लिक करा.

तुमचा ईमेल, पॅन, मोबाइल नंबर (Email, PAN, mobile number) आणि एलआयसी पॉलिसी क्रमांक याची माहिती भरा.

बॉक्समध्ये captcha कोड टाका.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर OTP पाठवण्याची विनंती करा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होताच, तो सबमिट करा.

सबमिट केल्यानंतर यशस्वी नोंदणी झाल्याचा SMS प्राप्त होईल.

 

LIC च्या रेकॉर्डमध्ये अपडेट झाला आहे का ?

https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus या लिंकवर जा.

पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन तपशील आणि captcha कोड टाका.

नंतर सबमिट वर क्लिक करा

पॅन अपडेटबाबत माहिती तुम्हाला दिसेल. देशातील आयपीओ मार्केट सध्या तेजीत आहे. एकामागून एक, अनेक कंपन्या त्यांचे आयपीओ आणत आहेत.

लवकरच LIC IPO लाँच होत आहे. ही एक गुंतवणूकदारांना पैसे कमवण्याची चांगलीच संधी असणार आहे ?

 

Web Title :- LIC IPO | Lic policy holders can invest in lic ipo know what is the benefit and linking process with pan

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा