LIC Jeevan Pragati | ‘एलआयसी’च्या ‘या’ योजनेत दररोज 200 रुपये गुंतवा अन् मिळवा 28 लाख

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्ही चांगल्या आणि सुरक्षित गुंतवणूक (Secure Investment) करण्याचा विचार करत असला, तर ‘एलआयसी’ तुमच्यासाठी अतिशय चांगली योजना घेऊन आली आहे. ‘एलआयसी’च्या जीवन प्रगती योजनेमध्ये (LIC Jeevan Pragati) दररोज 200 रुपयांची बचत (Saving Rs 200 Per Day) केली तर तुम्हाला 28 लाख रुपयांचा लाभ मिळेल. LIC ची जीवन प्रगती योजना (LIC Jeevan Pragati) एक एंडोमेंट प्लॅन (Endowment Plan) आहे, जी तुम्हाला सुरक्षिततेसोबतच बचत देखील देते. या योजने मध्ये रिस्क कव्हर (Risk Cover) दर पाच वर्षांनी वाढतो.

 

कमाल वयोमर्यादा 45 वर्षे
LIC च्या जीवन प्रगती योजनेमध्ये (LIC Jeevan Pragati) गुंतवणूक करण्यासाठी किमान 12 वर्षे वय असले पाहिजे. त्याच वेळी, या पॉलिसीमध्ये (Policy) गुंतवणूक करण्यासाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आहे. या पॉलिसीमध्ये तुम्हाला दर महिन्याला 6 हजार रुपये म्हणजे दररोज 200 रुपये गुंतवावे लागतील. गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला या योजनेत जास्तीत जास्त 20 वर्षांसाठी गुंतवणूक करता येते.

पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास, मृत्यूवर विम्याची रक्कम + सिंपल रिवर्सनरी बोनस (जमा झालेला बोनस) + फायनल एडीशन बोनस (असल्यास) त्याच्या/तिच्या नॉमिनीला दिला जाईल.

 

डेथ बेनिफिट मिळतो
LIC च्या जीवन प्रगती योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला बचती सोबत संरक्षण मिळते. LIC च्या या योजनेत, तुम्हाला नियमित प्रीमियम भरला तर डेथ बेनिफिट ही मिळतो.
त्याची रक्कम प्रत्येक पाच वर्षांनी वाढते.
तुम्ही पॉलिसी किती वर्ष घेतली आहे यावर ते अवलंबून असते.

 

असा मिळतो फायदा

पहिल्या 0 ते 5 वर्षांसाठी, तुम्हाला 100 टक्के बेसिक मिळते.
6 ते 10 वर्षांच्या कार्यकाळात, तुम्हाला 125 टक्क्यापर्यंत बेसिक मिळते.
11 ते 15 वर्षांच्या कालावधीसाठी 150 टक्के बेसिक मिळते.
त्याच वेळी, 16 ते 20 या वर्षात 200 टक्के बेसिक मिळते.

 

Web Title :- LIC Jeevan Pragati | Save rs 200 per day in lic jeevan pragati yojana you will get a benefit of up to rs 28 lakh

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा