अडीच महिन्यात LIC चे ‘बुडाले’ 2 लाख कोटी रूपये, गुंतवणूकदरांची ‘चिंता’ वाढली !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरस आता संपूर्ण जगात पसरला आहे. तर जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत घसरण सुरू आहे. याच कारणामुळे भारतासह जगभरातील इक्विटी मार्केटमध्ये मोठी विक्रीही होत आहे. स्थानिक बाजारात बीएसईचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स आणि एनएसईचा प्रमुख इंडेक्स निफ्टी-50 मध्ये सतत ऐतिहासिक घसरण दिसून येत आहे. बाजारातील या घसरणीमुळे पैसे बुडण्याची ही चिता आता सर्वसामान्यांनाही सतावू लागली आहे. देशातील सर्वात मोठी वीमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाला (एलआयसी) बाजारातील या घसरणीमुळे अंदाजे 1.9 लाख करोड रूपयांचा तोटा झाला आहे. बिझनेस स्टँडर्डने ही माहिती दिली आहे.

अडीच महिन्यात 1.9 लाख करोड रूपयांचे नुकसान

बिझनेस स्टँडर्डच्या रिपोर्टनुसार, अडीच महिन्यात एलआयसीला सुमारे 1.9 लाख करोड रूपयांचे नुकसान झाले आहे. देशातील अनेक छोट्या-मोठ्या कंपन्यांमध्ये एलआयसीने गुंतवणूक केली आहे. एलआयसीला हे नुकसान अशावेळी झाले आहे जेव्हा एलआयसीला बाजारात लिस्ट करण्याची सरकारकडून प्रक्रिया सुरू आहे. एलआयसीच्या लिस्टिंगच्या पूर्वी केंद्र सरकारला कायद्यातील दुरूस्तीसह नियमांनुसार मंजूरीची प्रक्रियासुद्धा करावी लागणार आहे.

बीएसई 500 मध्ये 209 कंपन्यांची बिघडवली एलआयसीची स्थिती

डिसेंबर 2019 ला संपलेल्या तिमाहीपर्यंत एलआयसीची एकुण होल्डिंग 6.02 लाख करोड रुपयेपर्यंत होती, जी आता घटून 4.14 लाख करोड रूपयांची गंतवणूक केली आहे. हा रिपोर्ट एस अँड पी बीएसई 500 इंडेक्सच्या 209 कंपन्यांच्या अभ्यासाच्या आधारावर आहे, ज्यामध्ये डिसेंबर 2019 पर्यंत एलआयसीने 1 टक्केपेक्षा जास्त भागीदारी ठेवली आहे. बीएसईच्या एकुण बाजार भांडवलात या कंपन्यांची एकुण भागीदारी सुमारे 65 टक्के आहे.

कोणत्या सेक्टरमधून एलआयसीला किती नुकसान

एलआयसीला होणार्‍या एकुण नुकसानीत सुमारे 30 टक्के म्हणजे 50,810 करोड रूपये बँकेसह बँकिंग सेक्टर आणि नॉन-बँकिंग सेक्टरच्या कंपन्या आणि वीमा कंपन्यांमुळे झाले आहे. तेल आणि गॅस सेक्टरमधील कंपन्यांमुळे 36,020 करोड रूपये, सिगारेट मकेर्सकडून 17,374 करोड रूपये, आयटी सेक्टर्सकडून 15,826 करोड रूपये, मेटल सेक्टरकडून 12,045, आटोमोबाईल सेक्टरकडून 11,329 करोड रूपये आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरकडून 10,669 करोड रूपयांचे नुकसान झाले आहे. याशिवाय या अडीच महिन्यात अन्य सेक्टरच्या कंपन्यांकडून एलआयसीला सुमारे 10,000 करोड रूपयांचे नुकसान झाले आहे.

कोरोनाने बुडवले गुंतवणूकदारांचे पैसे

या रिपोर्टमध्ये इकॉनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक जी चोक्कलिंगम यांचा संदर्भ देऊन म्हटले आहे की, कोविड-19 च्या कारणामुळे सेवा क्षेत्रातील कंपन्यांचे सर्वात जास्त नुकसान होईल. कृषी क्षेत्रावर परिणाम होणार नाही, परंतु मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर स्पलाईबाबात अडचणी वाढू शकतात. अन्य सेक्टरमध्ये टेलिकॉम सेक्टर यापासून वाचू शकते, तर हॉटेल, ट्रॅव्हल आणि टुरिझम सेक्टरसाठी हा कठीण काळ आहे. यामुळे गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होईल, ज्यामध्ये एलआयसी सुद्धा आहे.