LIC Policy | 12 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी LIC ची Policy, रोज 100 रुपयांपेक्षा कमी बचतीवर मिळेल इतका रिटर्न

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Policy | सध्याच्या काळात शिक्षण, आरोग्य आणि इतर खर्च खूप वाढले आहेत. अशावेळी लोक पालक झाल्यानंतर मुलांसाठी आर्थिक नियोजन करू लागतात. मुलांच्या शिक्षणासाठी लोक अधिक जोखीम घेण्यास कचरतात (LIC Jeevan Tarun Plan). अशा स्थितीत पालक अशा लक्ष्यासाठी गॅरेंटेड रिटर्न (Guaranteed Return Plan) इन्व्हेस्टमेंट प्लान शोधतात. (LIC Policy)

 

अशा पालकांचा शोध LIC च्या जीवन तरुण योजनेद्वारे (LIC Jeevan Tarun Plan) पूर्ण केला जाऊ शकतो. याचे कारण म्हणजे या फंडात छोट्या गुंतवणुकीतून तुम्ही मोठा फंड तयार करू शकता.

 

मुलांसाठी खास योजना
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार केली आहे. एलआयसी जीवन तरुण (LIC JEEVAN TARUN) ही एक नॉन-लिंक्ड, पार्टिसिपेटिंग, इंडिव्ह्युजल, लाईफ इन्श्युरन्स सेव्हिंग स्कीम आहे. जेव्हा तुम्ही या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा एलआयसी संरक्षण आणि बचत दोन्ही सुविधा देते. मुलांचे शिक्षण आणि इतर गरजा लक्षात घेऊन या योजनेत गुंतवणूक करता येते.

पॉलिसी घेण्याचे वय किती
LIC Jeevan Tarun Plan घेण्यासाठी, मुलाचे वय किमान 90 दिवस असावे. त्याचबरोबर यासाठी 12 वर्षांची कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात 12 वर्षांखालील मूल असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. (LIC Policy)

 

पॉलिसीतील गुंतवणुकीवर इतका मिळेल रिटर्न
LIC Calculator नुसार, जर एखाद्या व्यक्तीने 90 दिवसांपासून एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलासाठी दर महिन्याला सुमारे 2,800 रुपये (रु. 100 पेक्षा कमी) गुंतवले, तर मुलाच्या नावावर मॅच्युअर होईपर्यंत 15.66 लाख रुपये फंड मिळू शकतो. ही पॉलिसी 25 वर्षात मॅच्युअर होते. त्याच वेळी, तुम्हाला 20 वर्षांसाठी दरमहा 2,800 रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल.

 

मिळतो दुप्पट बोनस
मूल 25 वर्षांचे झाल्यावर या पॉलिसी अंतर्गत संपूर्ण फायदे मिळतात. हा एक फ्लेक्सिबल प्लान आहे. या योजनेवर तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी दुप्पट बोनस मिळेल. तुम्ही ही पॉलिसी रु. 75,000 च्या किमान सम अ‍ॅश्युअर्ड (Sum Assured) वर घेऊ शकता. मात्र, यासाठी कोणतीही कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही.

 

प्रीमियम भरण्याची पद्धत
कोणीही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक किंवा मासिक आधारावर प्रीमियम भरू शकतो.
हे पैसे NACH द्वारे अदा केले जाऊ शकतात किंवा प्रीमियम थेट पगारातून कापला जाऊ शकतो.

जर तुम्ही मुदतीत प्रीमियम जमा करू शकत नसाल,
तर जे त्रैमासिक ते वार्षिक आधारावर प्रीमियम भरतात त्यांना 30 दिवसांचा वाढीव कालावधी मिळेल.
दुसरीकडे, तुम्ही दरमहा पेमेंट जमा केल्यास, तुम्हाला 15 दिवसांचा अतिरिक्त कालावधी मिळेल.

 

Web Title :- LIC Policy | lic jeevan tarun plan invest rs 100 per day to create fund for children

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा