LIC Policy | एलआयसीच्या ‘या’ प्लानमध्ये केवळ 73 रुपये जमा केल्यावर मिळतील 10 लाख रुपये, जाणून घ्या काय आहे प्लान ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – LIC Policy | तुम्हीही LIC मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका एलआयसी पॉलिसीबद्दल (LIC Policy) सांगणार आहोत, ज्यामध्ये 73 रुपये जमा केल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 10 लाख रुपये मिळतील. (LIC New Jeevan Anand Plan)

 

होईल दुप्पट फायदा
जीवन विम्याच्या या पॉलिसीचे नाव नवीन जीवन आनंद पॉलिसी आहे. यात तुम्हाला मॅच्युरिटीवर पूर्ण 10 लाख रुपये मिळतात. याशिवाय तुम्हाला लाईफटाईम डेथचे कव्हरही मिळते. 10 लाख रुपयांचा फंड बणवण्यासाठी, तुम्हाला दररोज त्यात 73 रुपये गुंतवावे लागतील. (LIC Policy)

 

जाणून घ्या काय आहे पॉलिसीची खासियत –

तुमचे वय किमान 18 वर्षे असावे.

या पॉलिसीमध्ये 50 वर्षांपर्यंतचे लोक अर्ज करू शकतात.

यामध्ये कमाल मॅच्युरिटी वय 75 वर्षे आहे.

याशिवाय, किमान पॉलिसीची मुदत 15 वर्षे आहे.

त्याच वेळी, कमाल पॉलिसीची मुदत 35 वर्षे आहे.

यामध्ये तुम्ही वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक आधारावर प्रीमियम भरू शकता.

विमा रकमेची कमाल मर्यादा नाही.

किमान मूळ विमा रक्कम एक लाख रुपये आहे.

 

टॅक्स बेनिफिट (Tax Benefit On LIC New Jeevan Anand Plan)

एलआयसीच्या या पॉलिसीमध्ये तुम्हाला प्राप्तीकर सवलतीचा लाभही मिळतो. यामध्ये प्राप्तीकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर लाभ मिळतो. मुदतपूर्ती किंवा मृत्यूच्या वेळी मिळालेल्या रकमेवर कोणताही कर भरावा लागणार नाही.

 

10 लाख रुपये कसे मिळवायचे ?
जर तुम्ही ही पॉलिसी वयाच्या 24 व्या वर्षी 5 लाख रुपयांच्या विमा रकमेसह खरेदी केली तर तुम्हाला वार्षिक सुमारे 26815 रुपये जमा करावे लागतील. जर आपण एका दिवसाच्या आधारावर पाहिले तर ते दररोज सुमारे 73.50 रुपये असतील. समजा तुम्ही 21 वर्षांसाठी पॉलिसी घेतली असेल, तर तुमची एकूण गुंतवणूक सुमारे 5.63 लाख असेल, ज्यामध्ये तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी बोनससह 10 लाख रुपयांहून अधिक मिळतील.

मॅच्युरिटीवर मिळतील 10 लाख रुपये

विम्याची रक्कम + साधा प्रत्यावर्ती बोनस + अंतिम अतिरिक्त बोनस

5 लाख + 5.04 लाख + 10 हजार = 10.14 लाख

जर पॉलिसीधारक 21 वर्षे पूर्ण झाल्यावर जिवंत राहिला तर त्याला 10 लाखांहून अधिक रक्कम मिळेल.

 

घेऊ शकता कर्जाचा लाभ
याशिवाय तुम्ही या पॉलिसीवर कर्जही घेऊ शकता. जर तुम्ही प्रीमियम कालावधीत कर्ज घेतले असेल, तर कमाल क्रेडिट सरेंडर मूल्याच्या 90 टक्केपर्यंत असेल.

 

Web Title :- LIC Policy | lic new jeevan anand plan get 10 lakh rupees on maturity check here details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा