कोण आहेत पुढचे सेना प्रमुख मनोज मुकुंद नरवाणे, वाचा त्यांच्या खास गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवाणे हे भारतीय सेनेचे भावी सेनाप्रमुख आहेत. 31 डिसेंबर रोजी जनरल बिपिन रावत सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर सेनेची कमान लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवाणे यांच्याकडे येणार आहे. जाणून घेऊयात कोण आहेत नेमके भावी सेनाप्रमुख.

नरवाने यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यात पूर्ण केले आहे. नरवणे हे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, पुणे आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी, देहरादूनचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मद्रास विद्यापीठ, चेन्नईमधून संरक्षण अभ्यासात पदव्युत्तर पदवी आणि इंदूरच्या देवी अहिल्या विद्यापीठातून संरक्षण आणि व्यवस्थापन विषयात एमफिल पदवी घेतली आहे.

नरवाणे यांनी 1 डिसेंबर 2017 ते 30 सप्टेंबर 2018 या कालावधीत जनरल ऑफिसर कमांडिंग-इन चीफ, आर्मी ट्रेनिंग कमांड म्हणून काम पाहिले. काश्मीर आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी कारवायांचा त्यांना बराच अनुभव आहे. जम्मू – काश्मीरमध्ये त्यांनी नॅशनल रायफल बटालियन आणि इन्फंट्री ब्रिगेडची जबाबदारी संभाळलेली आहे.

नरवाणे श्रीलंकेत शांती मिशन दलाचा देखील हिस्सा राहिलेले आहेत. ते तीन वर्षांपासून म्यानमारमधील भारतीय दूतावासात भारताचे संरक्षण संलग्न आहेत. नरवाणे 2017 मध्ये प्रजासत्ताकदिनानिमित्त परेड कमांडर देखील होते. त्यांचा जून, 1980 मध्ये सिख लाइट इन्फेंट्री रेजीमेंटच्या सातव्या बटालियनमध्ये देखील समावेश होता. सेनेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे अडचणीच्या काळात काम केल्याचा मोठा अनुभव आहे.

त्यांना जम्मू काश्मीरमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सेना पदक देखील देण्यात आलेले आहे.त्यांना नागालँडमध्ये आसाम रायफल्सच्या महानिरीक्षक पदाच्या कामगिरीबद्दल विशिष्ट सेवा मेडल मिळालेले आहे. प्रतिष्ठित स्ट्राइक कोरची जबाबदारी सांभाळल्याबद्दल देखील नरवाणे यांना अतिविशिष्ट सेवा मेडल ने सन्मानित करण्यात आलेले आहे. तसेच नरवाणे यांना परम विशिष्ट सेवा मेडल ने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/