Life Certificate | वाढवली हयातीचा दाखल जमा करण्याची शेवटची तारीख, आता ‘या’ तारखेपर्यंत जमा करू शकता

नवी दिल्ली – Life Certificate | सरकारी पेन्शनधारकांसाठी आपला वार्षिक हयातीचा दाखला (pensioners life certificate) जमा करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर, 2021 पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी जीवन प्रमाणपत्र (Life Certificate) जमा करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर होती. तारीख पुढे वाढवल्याने, सरकारी पेन्शनधारकांना थोडा दिलासा मिळेल, ज्यांनी अजूनपर्यंत आपला वार्षिक हयातीचा दाखला जमा केलेला नाही.

 

पेन्शनधारकांना (Pensioners) सतत पेन्शन (pension) मिळवत राहण्यासाठी हयातीचा दाखला जमा करणे आवश्यक आहे. पेन्शन आणि पेन्शनधारक कल्याण विभागाने 1 डिसेंबर 2021 ला एक कार्यालय निवेदनाच्या माध्यमातून तारीख पुढे वाढवण्याची घोषणा केली होती.

 

जारी केलेल्या निवेदनानुसार, अनेक राज्यांमधील कोविड-19 माहामारी (Covid-19 epidemic) पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे की, हयातीचा दाखला जमा करण्याची सध्याची कालमर्यादा पुढे वाढवण्यात यावी. तारीख वाढवल्यानंतर आता केंद्र सरकार (Central Government) चे सर्व पेन्शनधारक 31 डिसेंबर 2021 पर्यंत हयातीचा दाखला जमा करू शकता. या विस्तारित कालावधी दरम्यान, पेन्शन वितरण प्राधिकरण (PDA) द्वारे कोणत्याही अडथळ्याशिवाय पेन्शन देणे सुरू राहिल. (Life Certificate)

 

तारीख पुढ ढकलल्याने हयातीचा दाखला जमा करण्यासाठी शाखांमधील गर्दी नियंत्रित करणे सोपे होईल,
आणि हे पहावे की हयातीचा दाखल प्राप्त करतेवळी कोविड -19 बाबत योग्य काळजी घेतली जाईल.

 

निवेदनात म्हटले आहे की, पीडीए शाखांमध्ये योग्य व्यवस्था आणि सामाजिक अंतराचे
उपाय पाळण्यात येतील आणि गर्दी रोखली जाईल.
80 वर्षापेक्षा जास्त वयाचे पेन्शनधारक 1 ऑक्टोबरपासून हयातीचा दाखला जमा करू शकता.

 

Web Title :- Life Certificate | last date for submission of life certificate extended now you can submit till december 31

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा