PMC Property Tax | …म्हणून सत्ताधारी Property Taxची अभय योजना राबवत आहेत, काँग्रेस नेते आबा बागुल यांची टीका

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिकेचे (Pune Corporation) मागील पाच आर्थिक वर्षातील उत्पन्न पाहता उत्पन्नात वाढ करण्यात सत्ताधारी व प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि प्रशासनाकडून मिळकत कराची (PMC Property Tax) अभय योजना (PMC Abhay Yojana) राबविली जात असल्याची टीका काँग्रेस नेते (Congress leader) आबा बागुल (PMC Congress Group Leader Aba Bagul) यांनी केली आहे. तसेच मिळकत कर वसूल करण्यास प्राधान्य देण्याऐवजी करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंडात सवलत देणे हे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय केल्यासारखे आहे, असेही आबा बागूल (Aba Bagul) म्हणाले. पुणे महापालिकेचे आर्थिक हित पाहता मिळकत कराची अभय योजना आणण्याऐवजी मिळकत कराची (PMC Property Tax) दंडासहित वसूली करण्यास प्राधान्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी ठोस उपाय न केल्याने पुणेकरांना अनेक विकासकामे व प्रकल्पांपासून वंचित रहावे लागले आहे. प्रामाणिक करदाते प्रत्येक आर्थिक वर्षात पुणे महापालिकेचा मिळकत कर वेळेत भरतात. महापालिकेचे मिळकत कर हे प्रमुख उत्पन्नस्त्रोत असल्याने हा कर वेळेत भरावा व वेळेत कर न भरल्यास प्रति महिना 2 टक्के दंड घेणेबाबत महाराष्ट्र महापालिका अधिनियमामध्ये (Maharashtra Municipal Corporation Act) तरतूद केलेली आहे. हा दंड जास्त वाटत असल्यास कायद्यातच बदल करणेबाबत विचार विनिमय करा, परंतू दंड माफ करणे योग्य नाही. कायद्यामध्ये असलेला दंड माफ (PMC Property Tax) करणेचा अधिकार कोणासही नाही. अभय योजनेमुळे मिळकत कर वेळेत नाही भरला तरी चालेल अशी भावना करदात्यांची होत आहे.

 

 

मिळकत कर वसूल करण्यास प्राधान्य देण्याऐवजी करचुकवेगिरी करणाऱ्यांना दंडात सवलत देणे हे प्रामाणिक करदात्यांवर अन्याय केल्यासारखे आहे. यामध्ये भाजपसहित (BJP) अन्य राजकीय पक्ष देखील 1 कोटी ते 2 कोटी पर्यंत थकबाकी असलेल्यांसाठी अभय योजना राबवा अशी भूमिका घेतात. वास्तविक कर वसूली करणेची भूमिका घेणे अपेक्षित आहे. पुणे महापालिकेने यापूर्वी मिळकत कराची अभय योजना राबविली असता कोट्यावधींचा दंड माफ केल्याने महापालिकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे.

 

आता पुन्हा 1 कोटीपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या 3 लाख 73 हजार मिळकती असून
यांची मुद्दल 1260 कोटी व दंड 2900 कोटी असून दंडाची 75 टक्के रक्कम माफ केल्यास
2175 कोटींची थकबाकी माफ होणार आहे. व्याजाची रक्कम माफ करणे संस्थेच्या हिताचे नाही.
अशा प्रकारे कोटयावधींची माफी वारंवार दिल्यास नागरिकांची कर वेळेत भरणेची
आर्थिक शिस्त बिघडेल व महानगरपालिकेला कूलूप लावल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
उत्पन्न वाढीसाठी होर्डिंग पॉलिसी (Hoarding policy) व अन्य मार्ग असून याचा विचार करा.
अन्यथा अभय योजनेचे भविष्याकाळात वाईट परिणाम दिसतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा आबा बागुल यांनी दिला आहे.

 

Web Title :- PMC Property Tax | … So the ruling party is implementing Abhay Yojana of Property Tax, criticizes Congress leader Aba Bagul

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा