कोविड-19 मधून बरे झालेल्यांना Life Insurance Policy साठी खूप प्रतीक्षा करावी लागेल ! पाहावी लागेल 6 महिन्यांपर्यंत वाट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Life Insurance Policy | कोविड-19 चे ‘बळी’ ठरलेले लोकं या आजारातून बरे झाले असतील, परंतु अडचणींनी त्यांची साथ सोडलेली नाही. आता ज्या लोकांना कोरोनाची लागण झाली आहे त्यांना आता जीवन विमा खरेदी (Life Insurance Policy) करण्यात अडचणी येत आहेत. विमा कंपन्या आता कोरोनाबाधित लोकांचा विमा उतरवण्यास नाखूष आहेत. जीवन विमा कंपन्यानी (Life Insurance Company) कोविडमधून बरे झालेल्या लोकांना विमा पॉलिसी (Insurance Policy) घेण्यासाठी एक ते तीन महिन्याचा वेटिंग पीरियड दिला आहे.

 

संसर्गाची तीव्रता आणि हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता या आधारावर, विमा कंपन्या COVID-19 मधून बरे झालेल्या लोकांसाठी विमा पॉलिसीचे (Life Insurance Policy) प्रस्ताव पुढे ढकलत आहेत. काही प्रकरणांमध्ये, सहा महिन्यांपर्यंत वेटिंग पीरियड (Waiting Period for Insurance) दिला जात आहे. टर्म इन्शुरन्ससाठी (Term Insurance) वेटिंग पीरियड अधिक आहे. ज्यांना आधीच काही आजार आहेत आणि जे कोरोनाच्या विळख्यात आले आहेत त्यांच्याकडून एक्स-रे सारख्या इतर वैद्यकीय चाचण्यांचीही कंपन्या मागणी करत आहेत.

 

कोरोनाच्या नंतरच्या परिणामांची भीती
सूत्रानुसार असे समोर आले आहे कि पॉलिसीबाझार डॉट कॉमच्या टर्म लाइफ इन्शुरन्सचे हेड सज्जा परवीन (Sajja Parveen) याचे असे म्हणणे आहे की भारत सध्या कोविड-19 च्या तिसऱ्या लाटेच्या मध्यभागी आहे. गेल्या काही आठवड्यांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटचे आफ्टर इफेक्ट्स (covid-19 after effect) काय असतील हे सध्या कोणालाही माहीत नाही. (Life Insurance Policy)

त्यामुळे, नुकतीच कोरोना संसर्गातून बरी झालेल्या व्यक्तीला टर्म लाइफ इन्शुरन्स पॉलिसी घेण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागते. टर्म इन्शुरन्स मध्ये, एखाद्या व्यक्तीसाठी खूप कमी प्रीमियमवर (Insurance Premium) मोठ्या रकमेचा विमा उतरवला जातो. तज्ञांचे म्हणणे आहे की वेटिंग पिरियड कोविड-19 चे नंतरचे परिणाम जाणून घेण्यास मदत करते, जे नंतर पॉलिसी खरेदी करताना डिस्‍क्‍लोज फार्म मध्ये डिस्‍क्‍लोज केले जाऊ शकते.

 

कोविड संदर्भात फॉर्म भरणे आवश्यक आहे.
टर्म प्लॅन खरेदी करू इच्छिणाऱ्यांना अनिवार्यपणे कोविड डेक्लरेशन फार्म भरावा लागेल.
यामध्ये, इतर गोष्टींबरोबरच, गेल्या 90 दिवसांत त्यांना विषाणूची लागण झाली आहे की नाही हे देखील विचारले आहे.
याशिवाय, संसर्गाच्या तीव्रतेवर आधारित चाचणीचे निकाल देखील मागवले जातात.

 

एक ते सहा महिन्याचा वेटिंग पीरियड.
India First Life Insurance मध्ये कोविडबाधित लोकांसाठी 30 दिवस ते 6 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे.
इंडियाफर्स्ट लाइफचे डेप्युटी सीईओ ऋषभ गांधी (rushabh gandhi) म्हणाले की, जर एखादी व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये नसेल तर आमच्याकडे 30 दिवसांचा कालावधी आहे.
परंतु जर तो होम क्वारंटाईनमध्ये असेल आणि त्याला आधीपासून काही आजार असतील तर वेटिंग पीरियड 60 दिवस असू शकतो.
अधिक गंभीरपणे ज्यांना हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता असते त्या लोकांसाठी हा वेटिंग पीरियड सहा महिन्यांपर्यंत असू शकतो.

 

Web Title : Life Insurance Policy | buying life insurance may not be easy for those who recovering from covid 19

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा