Aadhaar कार्ड अन् ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करा, अन्यथा….

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – बनावट वाहन चालक परवान्याचे (ड्रायव्हिंग लायसन्स डुप्लिकेशन) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यावर उपाय म्हणून आता ड्रायव्हींग लायसन्सशी Driving license आता आधार कार्ड लिंक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे आता पॅनकार्ड आणि आधार कार्ड लिंक ज्या पद्धतीने केले तशाच पद्धतीने ड्रायव्हिंग लायसन्सही Driving license आधार कार्डशी जोडणे बंधनकारक झाले आहे.

अगदी सहजपणे आपणाला ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्डला जोडणे शक्य आहे त्यासाठी खालील स्टेप फोलो करा. सर्वप्रथम राज्याच्या परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जा. त्यानंतर तेथे तुम्हाला लिंक आधार या पर्यायावर क्लीक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला ड्रॉप-डाऊनवर जाऊन ‘ड्रायव्हिंग लायसन्स’च्या पयार्यावर क्लिक करावे लागेल.

याठिकाणी तुम्हाला तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा नंबर विचारला जाईल.

तो नोंदवल्यानंतर ‘गेट डिटेल्स’ या पयार्यावर क्लिक करावे लागेल.

मग तुम्हाला आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर नोंदऊन सबमिटवर क्लीक करावे लागेल.

यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एसएमएसद्वारे एक ओटीपी येईल.

तो ओटीपी नोंदवल्यानंतर तुमच्या आधार कार्डला ड्रायव्हिंग लायसन्स लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

परवाना पडताळणीसाठी आधार बंधनकारक

कोरोनामुळे परिवहन बिव्हगातील कामे अनेक दिवसापासून खोळंबली आहे.

मात्र आता कोरोनाच्या रुग्ण संख्येत घेत होऊ लागल्याने सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेनें सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार अनेक राज्यात परिवहन कार्यालये सुरु होत असून ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित कामे पुन्हा सुरू होऊ लागली आहेत.

त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सच्या पडताळणीसाठी आधार कार्डची गरज भासणार आहे.

यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या आरटीओ कार्यालयात जावे लागेल.

Also Read This : 

Pune : पुण्यात 27 वर्षीय इंजिनीअर पतीला 19 वर्षीय पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं संपवलं ! दुधातून झोपेच्या गोळ्या दिल्यानंतर गळा दाबून खून; लोणीकाळभोर परिसरातील घटना

 

तेलकट त्वचा असेल तर पावसाळ्यात ‘अशी’ घ्या काळजी ! जाणून घ्या 5 सोपे घरगुती उपाय

 

भारतात सापडला कोरोना व्हायरसचा आणखी एक ‘खतरनाक’ व्हेरिएंट, 7 दिवसात कमी करतो वजन – रिपोर्ट

 

डोळ्याजवळील सुरकत्या दूर करण्यासाठी ‘हे’ फूड्स रामबाण उपाय, 7 दिवसांमध्ये दूर होईल समस्या

 

Petrol-Diesel Price Today : एक दिवस दिलासा मिळाल्यानंतर आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, जाणून घ्या आजचे भाव

 

भाजप कार्यालयाजवळ 51 क्रुड बॉम्ब