DD नॅशनलवर आजपासून रामलीलाचे अयोध्येतून थेट प्रसारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रामलीलाचा कार्यक्रम डीडी नॅशनल वाहिनीवर लाईव्ह प्रसारित केला जाणार आहे. 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान संध्याकाळी 7 वाजल्यापासून याचे थेट प्रसारण होणार आहे. अशी माहिती दूरदर्शन आणि डीडी न्यूजचे महासंचालक मयांक अग्रवाल यांनी दिली आहे.

मयांक अग्रवाल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. मयांक अग्रवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, 17 ते 25 ऑक्टोबर दरम्यान डीडी नॅशनलवर संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत अयोध्येतून रामलीला कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता डीडी भारतीवरून तर दुपारी तीन वाजता डीडी नॅशनलवरून या कार्यक्रमाचे पुन:प्रसारण केले जाणार आहे.

या कार्यक्रमामध्ये रवि किशन, मनोज तिवारी, आसरानी, विंदू दारासिंग, रझा मुराद हे सिनेक्षेत्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार आहेत. यांच्यासह इतर अनेक प्रसिद्ध कलाकार यामध्ये भूमिका साकारणार आहेत.