Live In Relationship : ‘ती अशी काय बोलली आणि त्यानं तिचा खूनच केला, तरूणानं तरूणीला संपवलं

शिक्रापुर : शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील कारेगाव येथे लिव्ह अॕण्ड रिलेशन शिप मध्ये राहणारा तरुणाकडून गरोदर प्रेयसीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.तर खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. याबाबत पोलीस शिपाई विजय शिंदे यांनी फिर्याद दिली

या बाबतीत रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सायंकाळी ६:३५ वाजता एक व्यक्ती घाबरलेल्या अवस्थेत पोलीस ठाण्यात आला.त्यावेळेस आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी त्याचे नाव विचारले असता त्याने स्वतःचे नाव किरण फुंदे (रा. राजगड प्लाझा, दुसरा मजला रुम न. ३३ कारेगाव) असे सांगितले. तसेच त्याने एक कोरा कागद व पेन मागितला. व त्यावर त्याने “सर मी टेंशन डिप्रेशनचा पेशंट आहे. आणि या अवस्थेत माझ्याकडुन एक खून झाला आहे. मी माझ्या गर्लफ्रेंडचा गळा दाबून जीव घेतला आहे. कृपया मला फाशी द्या ” असे लिहून तो कागद पोलिसांकडे दिला. तसेच मी रुमला बाहेरुन लाॕक लावून आलो आहे, असे सांगत रुमची चावी पोलिसांकडे दिली.

घटनेचे गांभीर्य ओळखत ठाणे अंमलदार गणेश सुतार यांनी तात्काळ मदतनीस असलेले पोलीस शिपाई विजय शिंदे यांना रुमची चावी देत राजगड प्लाझा येथे जाऊन खात्री करण्यास सांगितले. त्यानंतर सदर ठिकाणी पोलीस गेले असता स्थानिक रहिवाशाच्या मदतीने तेथील रुम नं ३३ची पाहणी केली असता एक २४ वर्षीय युवती मयत अवस्थेत आढळून आली. त्यानंतर रुम मालाकासमोर पोलिसांनी आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, मी व माझी प्रेयसी सोनामनी कान्हू सोरेन (वय २४)आम्ही गेले ४ ते ५ महिन्यापासून कारेगाव येथील राजगड प्लाझा येथील रुम नं ३३ मध्ये लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होतो. त्यावेळेस सहखुशीने शारीरिक संबंधातून माझी प्रेयसी गरोदर राहिली. परंतु, आम्हाला ते बाळ नको होते. बाळ खाली करण्यास भरपुर पैसे लागणार होते. आमच्या दोघांकडे पैसे नसल्याने आमचा कायम वाद होत होता.तर आज दुपारी ३ वाजता समंतीने शारीरिक संबंध ठेवताना सोनामनी ही अपमानकारक बोलली. त्यामुळे राग आल्याने त्याने गळा आवळून तिचा खून केला. त्यानंतर तो स्वतःहुन पोलीस ठाण्यात हजर झाला. याबाबत आरोपी किरण बाळासाहेब फुंदे याच्या विरोधात रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस रांजणगाव एमआयडीसी पोलिस करत आहेत.