मे महिन्यात ‘Lockdown 4.0’ टॉप सर्च ट्रेंड, ‘कोरोना’ व्हायरसच्या सर्चमध्ये झाली ‘घट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मे 2020 मध्ये भारतात लॉकडाउन 4.0 गूगल सर्चमध्ये टॉप ट्रेंड होता. मे महिन्यात, “कोरोनाव्हायरस लॉकडाउन झोन दिल्ली” या कीवर्डच्या सर्चेजमध्ये 1,800 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान 24 मार्च रोजी देशात पहिल्यांदा लॉकडाउन जाहीर करण्यात आले. गुगलने म्हटले की, मेमध्ये लॉकडाऊन 4.0 च्या शोधामध्ये 3,150 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मे महिन्यात लॉकडाउन 4.0 हा सर्वात जास्त शोधला गेलेला कीवर्ड होता. दुसर्‍या क्रमांकाचा “ईद मुबारक” होता, ज्याने सर्चेजमध्ये 2,650 ची वाढ पाहायला मिळाली. तर कोरोना विषाणू या कीवर्डच्या शोधात घट झाली आहे. एप्रिलमध्ये कोरोना विषाणू हा सर्वात जास्त शोधला गेलेला कीवर्ड होता, तो मे मधील 12 व्या क्रमांकाचा कीवर्ड बनला. एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कोरोना विषाणूशी संबंधित शोधात 50% पेक्षा जास्त घट झाली आहे.

गूगलच्या टॉप ट्रेडिंग सर्चमध्ये “लस” हा कीवर्डदेखील समाविष्ट झाला असून शोधात 190 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गूगलच्या मते 2004 नंतर प्रथमच लसीच्या कीवर्डसाठी बरेच शोध घेण्यात आले. “इटली कोरोनाव्हायरस लस” या किवर्डचा शोध 750 टक्के जास्त झाला.

प्रश्नांसंदर्भात बोलायचे झाल्यास, मे मध्ये, गुगलवर प्रश्नाच्या बाबतीत, कोरोना व्हायरस कोणत्या आजाराशी संबंधित? हा प्रश्न टॉपवर राहिला. त्यानंतर, चीनमध्ये कोरोना व्हायरस पहिल्यांदा कोठे ओळखला गेला ? आणि कोणती लक्षणे असणारा व्यक्ती कोरोना व्हायरस पसरवतो ? यांचा शोध लोकांनी घेतला.

कोरोना विषाणूसंदर्भात मे मध्ये गोवा, मेघालय आणि चंदीगडमध्ये सर्वाधिक शोध घेण्यात आला. यानंतर महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्लीतही कोरोनासंदर्भात बराच शोध घेण्यात आला. भारतातील गुगलवर सर्वाधिक शोध हा सहसा चित्रपट, बातमी आणि हवामानाशी संबंधित असतो, परंतु संसर्गामुळे लोकांनी कोरोना विषाणूचा सर्वाधिक शोध घेतला आहे. कोरोना विषाणूनंतर अ‍ॅमेझॉन प्राइम, पाताल लोक वरील वेब सिरीजचा मोठ्या प्रमाणात शोध घेण्यात आला आहे.