Coronavirus : ‘लॉकडाऊन’ दरम्यान अडचण येऊ नये म्हणून सरकारनं दिला कंट्रोल रूमचा ‘हा’ टेलीफोन नंबर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुर्ण देश कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे. पण त्यादरम्यान, सर्वात मोठे आव्हान म्हणजे रोजच्या लागणाऱ्या गोष्टी सामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचवायचे? आपत्कालीन परिस्थितीत सुचनाचे अभाव हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत सरकारने मदत कार्यात गुंतलेल्या कंपन्या आणि उद्योग संघटनांसाठी आवश्यक माहिती जाहीर केली आहे.

शासनाने कंट्रोल रुम तयार केले
या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, देशभरातील लॉकडाऊन दरम्यान, वाणिज्य मंत्रालयाच्या डीपीआयआयटी (उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग) ने आपल्यासाठी एक कंट्रोल रुम तयार केले आहे. आपणास कोणत्याही प्रकारची मॅन्युफॅक्चरिंग ट्रांसपोर्टेशन, वितरण, आरोग्यविषयक उत्पादनांमध्ये कोणतीही अडचण येत असेल तर ते कंट्रोल रुममध्ये सांगू शकता. या कंट्रोल रुममधून देशभरात देखरेख ठेवण्यात येणार आहे.

ही देखील महत्वाची माहिती आहे
लोकांशी थेट संपर्क साधण्यासाठी केंद्र सरकारने एक फोन नंबर आणि ईमेल आयडी देखील जारी केला आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत या दूरध्वनीवर संपर्क साधता येईल.
Telephone: 011- 23062487
Email: [email protected]

नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी लक्षात ठेवा –
अधिकारी म्हणाले की, कंट्रोल रूममधील तुमची तक्रार किंवा सूचना यावर राज्य सरकार आणि संबंधित जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आव्हानांवर उपाय केंद्र सरकार सोडवेल. यासंदर्भात राज्यांना देखील सांगण्यात आले आहे की, लॉकडाऊन परिस्थितीत पुरवठा राखण्यासाठी त्यांनी सहकार्य करावे व आवश्यक त्या व्यवस्था कराव्यात. काही अडचण आल्यास, ते सोडविण्यासाठी आम्हाला त्वरित सांगावे.

त्याचबरोबर, सध्या 9,000 फ्रेट मालगाड्या पटरीवर धावत आहेत, ज्या आधीच 40% पेक्षा जास्त अन्न आणि बाकी गरजेचे सामान घेऊन जात आहेत. यावेळी ट्रॅकवर प्रवासी गाड्या नसल्यामुळे या मालगाड्या ठरलेल्या वेळेच्या आधी माल वितरीत करीत आहेत.