Lockdown 5.0 : देशात 30 जून पर्यंत राहणार लॉकडाऊन, गृह मंत्रालयानं जाहीर केली नवीन गाईडलाइन

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात रविवार लॉकडाऊन 4.0 संपणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं लॉकडाऊन 5.0 साठी नवीन गाईडलाइन जाहीर केली आहे. शनिवारी कोरोना व्हायसरचे सुमारे 7900 रूग्ण आढळले होते तर एकुण संक्रमितांची संख्या 1.69 लाख पर्यंत पोहचली होती. आतापर्यंत 4900 जणांचा बळी कोरोनामुळं गेला आहे. दरम्यान उपचारानंतर बर्‍या होणार्‍या बाधितांच्या संख्येत मोठया प्रमाणावर वाढ झाली असून ती 81 हजारांवार पोहचली आहे. दरम्यान, सरकारनं लॉकडाऊन 5.0 हा 30 जून पर्यंत असेल असं जाहीर करून नवीन गाईडलाइन जाहीर केली आहे.

शाळा आणि कॉलेज उघडण्यासंदर्भातील निर्णय केंद्र सरकारनं राज्य सरकारांवर सोडला आहे. जुलैमध्ये राज्य त्यावर निर्णय घेतली. हॉटेल, धार्मिक स्थळ, रेस्टॉरंट 8 जून पासून उघडतील. दरम्यान, सरकारनं काही नियम आणि अटींवर त्यांना उघडण्याची परवानगी दिली आहे. देशात रात्री 9 ते पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान कर्फ्यू लागू राहणार आहे. नागरिक एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जावू शकतील. आता त्यांना पास दाखवण्याची देखील गरज नाही.