अक्षयला ‘नमो टीव्ही’चा अँकर बनवायला पाहिजे : असदुद्दीन ओवेसी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचा खिलाडी, अभिनेता अक्षय कुमार यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलखात घेतली. ही मुलाखत संपूर्ण देशभर गाजली देखील पण विरोधकांकडून या मुलाखतीवर टीका देखील करण्यात येत आहे. आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी देखील या मुलाखतीवरून टीका केली आहे. ‘अक्षय कुमारला नमो टीव्हीचे अँकर बनवायला पाहिजे अशी टीका ओवेसी यांनी केली आहे.

यावेळी बोलताना ओवेसी म्हणाले, “वृत्तवाहिनीच्या अँकरना अभिनय जमत नाही म्हणून मोदींनी अभिनेत्यालाच अँकर करून टाकले. अक्षय कुमारला आता नमो टीव्हीचा अँकर बनवायला पाहिजे असा टोला ओवेसींनी लागवला.

अक्षय कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण आंबे खाता का ? असा प्रश्न विचारला होता. याबाबत देखील ओवेसींनी खिल्ली उडवली.’आंबा कसा खातात जर माहित नसेल तर हा प्रश्न कशाला विचारला ? असे म्हणत, ओवेसी यांनी अक्षय कुमार बरोबर पंतप्रधान यांच्यावर सुद्धा निशाणा साधला.

मला आंबे खाण्याची आवड आहे. कुटुंबातील परिस्थिती चांगली नसल्याने खरेदी करणे शक्य नव्हते. त्यामुळे, लहानपणी शेतात जाऊन झाडावर पिकलेले आंबे खात असे. अक्षयला दिलेल्या मुलाखतीत लहानपणीची आठवण सांगताना मोदींनी माहिती दिली होती. या मुलाखतीतून पंतप्रधान मोदींविषयी अनेक खाजगी आणि राजकीय गोष्टींची उकल करण्यात आली होती.