‘मोदीच माझी हत्या करतील’, ‘या’ मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी आरोप केला होता की, ज्या प्रमाणे इंदिरा गांधी यांची हत्या त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी केली होती त्याच पद्धतीने माझी देखील हत्या होऊ शकते. त्यानंतर त्यांच्या नवीन ट्विटने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. भाजप नेते विजय गोयल यांच्या ट्विटला उत्तर देताना केजरीवाल यांनी म्हटले आहे कि, माझ्या खाजगी सुरक्षा अधिकाऱ्यांऐवजी मोदींनाच माझा खून करायचा आहे.

त्याआधी शनिवारी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना केजरीवाल यांनी म्हटले होते कि, भाजपला मला मारायचं आहे. यासाठी ते कट आखत आहेत. एक दिवस ते माझा खून करतीलही. केजरीवाल यांनी केलेल्या या आरोपानंतर गोयल यांनी ट्विटवरून त्यांच्यावर निशाना साधला होता. या ट्विटमध्ये गोयल यांनी म्हटले होते कि, तुम्ही अशा पद्धतीने स्वत:च्या पीएसओवर शंका व्यक्त करणे चुकीचे आहे. तुम्हाला जो पीएसओ हवा आहे तो घ्या. यासंदर्भात माझी काही मदत लागली तर सांगा. आम्ही तुमच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतो.

दरम्यान, याआधी देखील केजरीवाल यांनी दिल्लीकरांच्या सुरक्षेविषयी ट्विट केले होते. दिल्लीत झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाच्या हत्येनंतर त्यांनी हे ट्विट केले होते. त्यानंतर सोमवारी केजरीवाल यांनी पोलीस अधिकारीच सुरक्षित नसेल तर दिल्लीकरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची असा सवाल केला होता.

Loading...
You might also like