धक्कादायक ! भाजपला मत दिलं म्हणून पत्नीची फावड्यानं हत्या

लखनऊ : वृत्तसंस्था – नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडल्या, आणि आता २३ तारखेला याचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये याच मतदानावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. भाजपला मत दिलं म्हणून उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील तरूणानं फावड्यानं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नीलम असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर रामबचन असं हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे.

काय आहे प्रकरण ?

मतदान कुणाला करायचे यावरून या पती पत्नीत वाद झाला. पती रामबचन हा बसपाला मत दिलं पाहिजे या मताचा होता तर पत्नी नीलम हि भाजपला मतदान करण्याच्या विचाराची होती. मात्र आपण सांगूनही पत्नीने आपले न ऐकता भाजपला मतदान केल्याचा राग पतीला आला आणि त्याने तिची डोक्यात फावडा घालून हत्या केली. या हत्येनंतर तो तेथून पसार झाला.

त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या महिलेच्या माहेरच्या लोकांनी हि हत्या हुंड्यासाठी केल्याचा आरोप केला. त्यांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी रामबचनसह त्याच्या आई-वडिलांविरोधात हुंड्यांचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading...
You might also like