Lok Sabha Election 2024 | ‘आता सुप्रिया सुळे यांनीही त्यांचा ‘वायनाड’ शोधावा’, बारामतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून नियोजन सुरु; भाजप नेत्याची माहिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन झाल्यानंतर भाजपने (BJP) 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) तयारी सुरु केली. भाजपने राष्ट्रवादीचा (NCP) बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघ (Baramati Constituency) ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर येत्या काळात अनेक बडे नेते बारामतीला भेट देणार आहेत. याची सुरुवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांच्यापासून होत असून त्या सप्टेंबर महिन्यातील 22, 23, 24 तारखेला बारामती दौऱ्यावर येत आहेत. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) पुढील दोन दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत. बावनकुळे 6 तारखेपासून बारामती दौऱ्यावर आहेत. सीतारामन यांच्या दौऱ्याचा आढावा ते घेणार आहेत.

 

भाजप नेते आणि बारामतीचे प्रभारी राम शिंदे (Ram Shinde) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अमेठी (Amethi Constituency) पराभावावरुन राष्ट्रवादीला इशारा दिला आहे. अमेठीचा किल्ला आम्ही जसा सर केला तसा यंदा बारामतीचा किल्ला सर करणार असा इशारा राम शिंदे यांनी दिला आहे. 2014 साली आम्ही अमेठीत हरलो होतो पण आमच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आम्ही 2019 ला यश मिळवले. राहुल गांधींनी वायनाड मतदारसंघ (Wayanad Constituency) शोधला होता. पण आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही त्यांचा ‘वायनाड’ शोधावा. कारण आता बारमतीचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी दिल्लीतून (Lok Sabha Election 2024) नियोजन सुरु आहे. यांदा काहीही झालं तरी बारामतीचा गड सर करणारच, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला.

 

राम शिंदे पुढे म्हणाले, अमेठीमध्ये 2014 आमचा पराभव झाला. परंतु त्यानंतरही आम्ही थांबलो नाही.
आमचे प्रयत्न आम्ही सुरु ठेवले आणि 2019 मध्या आम्हाला यश आले. राहुल गांधी पराभूत होतील असे कोणालाही वाटले नव्हते,
परंतु भाजपने त्यांना पराभूत करुन ‘ए फॉर अमेठी’ मिशन यशस्वी झालं. आता ‘बी फॉर बारामती’चं मिशन आम्ही साध्य करणार आहोत.
आम्ही 2014 आणि 2019 च्या निवडणूकीत हरलो मात्र आता 2024 ला कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच.

इंदापूर येथील अर्बन बँकेच्या (Indapur Urban Bank) सभागृहात सीतारामन,
बावनकुळे यांचा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil),
किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे (Vasudev Kale), जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे (District President Ganesh Bhegade),
पृथ्वीराज जाचक, अविनाश मोटे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, मारुती वणवे, तेजस देवकाते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Web Title :- Lok Sabha Election 2024 | after amethi planning from delhi to make baramati a correct program ram shinde

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

BJP Narottam Mishra | भाजप मंत्र्याचे धक्कादायक विधान; म्हणाले; ‘शबाना आझमी, जावेद अख्तर आणि नसरुद्दीन शाह हे स्लीपर सेलच्या…’ (व्हिडीओ)

 

Pune Crime | ट्रॅफिक जाममुळे कारचालकाची PMPML बसचालकाला मारहाण; शिवीगाळ करणार्‍या कटके कुटुंबियांवर गुन्हा दाखल

 

Governor Appointed MLA | उध्दव ठाकरेंना धक्का ! राज्यपाल कोश्यारींकडून ‘महाविकास’च्या 12 आमदारांची यादी अखेर रद्द