Pune Crime | ट्रॅफिक जाममुळे कारचालकाची PMPML बसचालकाला मारहाण; शिवीगाळ करणार्‍या कटके कुटुंबियांवर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | शहरात वाहतूकीची कोंडी (Pune Traffic Jam Problem) जागोजागी दिसून येते. वाहतूक कोंडीमध्ये बसमुळे आपल्याला पुढे जाता येत नसल्याने चिडलेल्या एका कुटुंबाने चक्क बसचालकाला मारहाण केली. त्याच्या कुटुंबियाने सहकारी वाहक व बसप्रवाशांना शिवीगाळ करण्याचा प्रकार शंकर शेठ रोडवरील (Shankar Seth Raod, Pune) मिरा सोसायटीचे (Meera Society, Pune) गेटसमोर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजता घडला. (Pune Crime)

 

याप्रकरणी पोलिसांनी निखील राजेश कटके Nikhil Rajesh Katke (वय २६), कविता राजेश कटके Kavita Rajesh Katke (वय ४४), नितीन जयपाल कटके Nitin Jaypal Katke (वय ४७, रा. श्रीकृष्ण सोसायटी, गुलटेकडी) यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी बसचालक लक्ष्मण सुभाष धुमाळ (वय ४१, रा. कात्रज) यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २६५/२२) दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धुमाळ हे पीएमपीचे चालक आहेत. ते आळंदी ते स्वारगेट (Swargate To Alandi PMPML Bus) या बसवर चालक म्हणून काम करीत होते. आळंदीहून स्वारगेटला प्रवाशांना घेऊन येत असताना मिरा सोसायटीचे गेटसमोर ट्रॅफिक जाम असल्याने व सिग्नल लागल्याने त्यांनी बस बंद करुन थांबले होते.
यावेळी निखील कटके हा कार घेऊन रस्त्याच्या पलीकडून फिर्यादीचे बससमोर आडवी येथून थांबली होती.
त्याला गाडी ट्रॅफिकमधून काढता येत नसल्याने तो गाडीतून उतरुन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन आज तुझी गाडीच फोडतो, अशी धमकी दिली.
तेव्हा फिर्यादी याने शिवीगाळ करण्याचे कारण काय अशी विचारणा केली. तेव्हा त्याने फोन करुन आपल्या नातेवाईकांना बोलावून घेतले.
महिला व पुरुषांनी बसमध्ये चढून फिर्यादीस हाताने, चपलीने व जड वस्तूने पाठीवर, छातीवर, पोटात मारहाण केली.
फिर्यादीचे सहकारी वाहक अतुल कुलकर्णी व बसमधील प्रवासी मध्ये असले असताना त्यांना शिवीगाळ केली.
सहायक पोलीस निरीक्षक नाईक तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Car driver beat up PMPML bus driver due to traffic jam; A case has been registered against Katke families who abused

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा; राजकीय चढाओढीत एकमेकांवर आरोपप्रत्यारोप

 

Pune News | बांधकाम व्यावसायीकाच्या फायद्यासाठी झोपडपट्टीतील कुटुंबाना आगीतून फुफाट्यात जाण्याची भिती

 

Maharashtra Political Crisis | CM एकनाथ शिंदेंसमोर नारायण राणेंचे सूचक विधान; म्हणाले – ‘शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ’