Lok Sabha Election 2024 | लोकसभेचं बिगुल वाजलं, निवडणुकांच्या तारखा जाहीर; देशात 7 टप्प्यात होणार मतदान, 4 जून रोजी निकाल

महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान ! 13 मे ला पुणे, शिरूर, मावळमध्ये तर 7 मे ला बारामतीमध्ये मतदान; जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात कधी होणार मतदान

नवी दिल्ली : Lok Sabha Election 2024 | केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील 18 व्या लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन केली. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक प्रक्रिया आणि त्यासंदर्भातील अन्य माहिती दिली. देशातील 543 लोकसभा जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व जागांसाठी 4 जूनला मतमोजणी होणार असून महाराष्ट्रात पाच टप्यात मतदान होणार आहे.(Lok Sabha Election 2024)

देशभरात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक कार्यक्रम पार पडणार असून 19 एप्रिल 2024 रोजी देशात पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. त्यानंतर 4 जून 2024 रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकांचा निकाल एकत्रित जाहीर होईल. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान एकूण पाच टप्प्यात होणार आहे. 19 एप्रिलला पहिला तर 20 मे रोजी शेवटचा टप्पा असणार आहे.

महाराष्ट्रात कधी मतदान

पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा – 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा – 7 मे – रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024- Maharashtra Cabinet Decisions |लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी शिंदे सरकारचा धडाका, 72 तासात तीन मंत्रिमंडळ बैठका अन् 62 निर्णय

Marged Villages In PMC | पुणे : समाविष्ट 34 गावांच्या मूलभूत सोयी सुविधासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये 9 लोकप्रतिनिधींची सदस्यपदी नियुक्ती

Pune Dattanagar Double Murder Case | पुण्यात दुहेरी खूनाचा प्रकार उघडकीस, पतीकडून पत्नी आणि मुलीचा निर्घृण खून

PSI Dead Body Found In Koregaon Park Pune | पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील पोलिस उपनिरीक्षकाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ