Lok Sabha Election 2024 | EVM विरोधात विरोधक एकवटले! शरद पवारांच्या निवासस्थानी खलबतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Lok Sabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका व्हाव्यात या मागणीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी आपल्या निवासस्थानी विरोधकांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये EVM च्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी ईव्हीएम मशीनच्या कार्य़पद्धतीवर (Lok Sabha Election 2024) आक्षेप घेण्यात आला.
शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या बैठकिला काँग्रसचे (Congress) कपिल सिब्बल (Kapil Sibal), दिग्विजय सिंह (Digvijay Singh), राम गोपाल यादव (Ram Gopal Yadav) यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. दिग्विजय सिंह म्हणाले, ईव्हीएम संदर्भात काही आक्षेप आहेत. देशातील जनतेच्या मनात शंका आहे. यामध्ये गडबड करता येऊ शकते. अनेक प्रश्न आहेत ज्याचे उत्तर निवडणूक आयोगाने दिले पाहिजे. आमच्या मनातील संभ्रम दूर झाला पाहिजे. (Lok Sabha Election 2024)
A meeting of Opposition leaders was held at my residence today to discuss the efficacy of EVM and the concerns raised by political parties about voting through EVM.@ShriPatilKarad @supriya_sule @praful_patel pic.twitter.com/b1j2hpzBtu
— Sharad Pawar (@PawarSpeaks) March 23, 2023
कपिल सिब्बल म्हणाले, जेंव्हा जेंव्हा मशीन खराब होते, तेव्हा मतदाना भाजपच्या बाजूने जाते. आम्ही निवडणूक आयोगाकडे जाणार आहोत. आम्ही अनेक वर्षापासून हे मुद्दे मांडत आहोत. आम्ही त्यांना विचारणार की तुम्ही हा मुद्दा तडीस न्यायला पाहिजे. जर आयोगाने योग्य उत्तर दिले नाही तर आम्ही राजकीय पक्ष ठरवणार की पुढे काय करायचे? जगातील कोणतेही मशीन मॅन्युपुलेट करता येते. अमेरिका, जर्मनी या देशात मशीनचा वापर होत नाही. मग आपल्या देशात का वापर केला जातो. वन मॅन वन वोट असायला पाहिजे.
शरद पवारांनी लिहिले पत्र
स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या हितासाठी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (Electronic Voting Machine (EVM)
अचूक असण्याची आवश्यकता असून त्याच्या कथित गैरवापरासंदर्भात कोणतीही शंका मुख्य निवडणूक आयुक्तांनी (Chief Election Commissioner) दूर केली पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवार यांनी विरोधी नेत्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले, तज्ञांनी म्हटले आहे की चिप असलेली कोणतीही
मशीन हॅक केली जाऊ शकते आणि आम्ही लोकशाहीला अनैतिक घटकांकडून ओलिस ठेवू शकत नाही.
यासाठी स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांच्या हितासाठी आपल्या सर्वांना एकत्र येऊन तज्ञांचे विचार ऐकायला हवेत,
असं पत्रात म्हटले आहे.
Web Title :- Lok Sabha Election 2024 | Opponents united against EVM! Sharad Pawar’s residence is disturbed
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pune PMC Property Tax | 40 टक्के करासहीत भरलेली रक्कम परत कारावी, महापालिका आयुक्तांकडे मागणी