Lok Sabha Election 2024 | लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा लांबणीवर? समोर आलं कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली : Lok Sabha Election 2024 | लोकसभेची निवडणूक १४ मार्चला जाहीर होण्याची शक्यता होती. पण, आता ही निवडणूक आयोगाच्या दोन सदस्य निवडीनंतर होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवडणूक आयुक्तांसाठी दोन नावे दिल्यानंतर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर शिक्तामोर्तब करतील. (Election Commission Of India)

निवडणूक आयोगाच्या दोन सदस्यांच्या निवडीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी १५ तारखेला बैठक बोलवली आहे. त्यामुळे आता १८ तारखेनंतरच लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सांगितले.(Lok Sabha Election 2024)

निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे निवृत्त‌ झाले.
नंतर निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर
निवडणूक आयुक्तांच्या दोन जागा रिक्त झाल्या. या दोन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्ती संदर्भात १५ तारखेला मोदी यांनी बैठक बोलवली आहे.

केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही पदांसाठी प्रत्येकी पाच नावांचे दोन स्वतंत्र पॅनेल तयार करणार आहे.विरोधी पक्षनेते अधीररंजन चौधरी हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीमध्ये गृह सचिव आणि कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे सचिव यांचा समावेश आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amravati-Nagpur National Highway | धावत्या ट्रॅव्हल बसवर सिनेस्टाईल गोळीबार, ४ प्रवाशी जखमी, महाराष्ट्रातील महामार्गांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

Uddhav Thackeray On Eknath Shinde | पक्ष फोडणे ही तुमचा नालायकपणा सिद्ध करणारी वृत्ती…, वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशानंतर ठाकरेंचा हल्लाबोल!

Prakash Ambedkar On Mahavikas Aghadi | तुम्ही आपआपले उमेदवार जाहीर करताय, हे तुम्हाला मान्य आहे का? वंचितने व्यक्त केली जाहीर नाराजी

छोटा शेख सल्ला दर्गा: ‘रील’ व्हायरल करुन अफवा पसरवणाऱ्या दोघांवर वानवडी पोलिसांकडून FIR

Pune Kothrud Crime | किरकोळ कारणावरून तरुणावर सत्तुरने वार, कोथरुड परिसरातील घटना

Computer Engineer Arrested In Pune | पुणे : दुकानातून लॅपटॉप चोरणाऱ्या कॉम्प्युटर इंजिनियरला सायबर पोलिसांकडून अटक