Lok Sabha Election 2024 | इंदापूर येथे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

पुणे : Lok Sabha Election 2024 | लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी इंदापूर विधानसभा मतदारसंघात (Indapur Vidhan Sabha) नियुक्त क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पंचायत समिती सभागृह इंदापूर येथे आयोजित करण्यात आले.

या प्रशिक्षणामध्ये ईव्हीएमचे बॅलेट (EVM) युनिट व कंट्रोल युनिट तसेच आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) बाबत प्रथम स्तरीय तपासणी (एफएलसी), द्वितीय स्तरीय तपासणी (एसएलसी), सरमिसळ (रँडमायझेशन) व कार्यान्वयन (कमिशनिंग) प्रक्रियेविषयी आणि व्हीव्हीपॅट वाहतूकीबाबत माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी करण्यात येणाऱ्या अभिरूप मतदान (मॉकपोल), मतदानाच्यावेळी तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास करावयाच्या उपायोजनांबाबतही माहिती देण्यात आली. (Lok Sabha Election 2024)

इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील यांच्या मार्गदर्शखाली आयोजित करण्यात आले. प्रशिक्षक रवींद्र पिसे, उप अधीक्षक भूमी अभिलेख विजयकुमार आतार यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

पोलीस ठाण्यात मतदान जनजागृती

इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) शिक्षण विभाग इंदापूर मतदार जागृती मंचाच्यावतीने मतदार जागृती अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला.
या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. कदम आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिक्षण विस्तार अधिकारी संजय रुईकर यांनी मतदार नोंदणी व
नावात दुरुस्ती तसेच क्यूआर कोडद्वारे मतदार यादीत नाव शोधणे आदींचे मोबाईलवरून प्रात्यक्षिक दाखविले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Wagholi Crime | वाघोली येथील बिवरी गावात दरोडा, चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी लुटला 16 लाखांचा ऐवज

Pune Water Crisis-Traffic Issue | आम्हाला प्यायला पाणी आणि कोंडीमुक्त रस्ते कसे देणार? लोकसंख्येच्या विस्फोटामुळे पुण्याच्या पाण्याचा आणि वाहतुकीचा प्रश्न अतिगंभीरतेच्या दिशेने

Pimpri Murder Case | पिंपरी : मित्राचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला मध्य प्रदेशातून अटक

Ravindra Dhangekar | शहरात पुरेसे पाणी पुरवठ्याचे नियोजन करा ! आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी; महापालिका आयुक्तांना दिले पत्र