लोकसभा निवडणूक २०१९ : काँग्रेसचा आणि आमचा काही संबंध नाही, भाजपशी लढण्यास आम्ही सक्षम

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – सपा-बसपा आघाडी भारतीय जनता पार्टीशी लढण्यास सक्षम आहे. आमचा आणि काँग्रेसचा काही संबंध नाही. असे बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी म्हंटले आहे. काँग्रेसने सपा-बसपा आघाडीसोबत असल्याच्या अफवा पसरवू नये. असा इशाराही त्यांनी दिला.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरम्यान सपा-बसपा आघाडीसाठी सात जागांवर उमेदवार उभे करणार नसल्याची चर्चा सुरु आहे. याच चर्चेला पुर्नविनिराम देत उत्तर प्रदेशसह संपूर्ण देशात काँग्रेस पक्षाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेस आणि आमच्यात कोणत्याही तडजोडी अथवा आघाडी नाही.काँग्रेसकडून उठवण्यात येत असलेल्या अफवांना आमचे कार्यकर्ते बळी पडणार नाही.

काँग्रेसने उत्तर प्रदेशात सर्वच सर्व ८० जागांवर निवडणूक लढवावी, उमेदवार उभे करुन स्वबळावर निवडणुका लढवाव्या. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी मिळून भारतीय जनता पार्टीशी लढण्यात पूर्णपणे सक्षम आहे. असे बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी ट्विटर वर ट्विट करून म्हंटले आहे.

इतकेच नव्हे तर, सपा-बसपाने उत्तरप्रदेशमध्ये वेगळी चूल मांडल्याने लोकसभेची गणिते जुळविताना काँग्रेसला घाम फुटला आहे. यामुळे सपा आणि बसपाला महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या जागा सोडण्याचा विचारही काँग्रेस नेते करत होते. असेही त्यांनी म्हंटले.